निसर्ग अनमोल देणगी, त्याला आपण जपू या!

K C Pande
K C Pandeesakal

लेखक : के. सी. पांडे

निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष यांचा समावेश होतो. नैसर्गिक भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. निसर्ग भौतिक जगाची घटना आणि सामान्यत जीवनाशी संबंधित आहे.

निसर्ग आपल्यासाठी एक अविस्मरणीय देणगी आहे. निसर्गावर आपण प्रेम करून त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे "निसर्ग सुरक्षित तर मानव जीवित" सुरक्षित राहील हे कायम लक्षात ठेवावे. (saptarang latest marathi article by KC Pande nashik news)

K C Pande
पेले आणि पंचम!

हिंदीमध्ये असे म्हटले आहे,"जिसकी रचना इतनी सुंदर हो, तो वो कितना सुंदर होगा" ईश्वर आणि निसर्ग याला उद्देशून केलेली ही काव्यपंक्ती आहे आणि हे खरेच आहे. इतका अद्भुत निसर्ग ज्याची निर्मिती ईश्वराने केली आणि मानवी जीवन सुखकर झाले त्याचप्रमाणे निसर्गाच्या काही रचना त्यात प्रामुख्याने गारगोटी असेल किंवा इतर काही घटक असतील.

याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे रक्षण करणे, ते लोकांपर्यंत पोहोचविणे, त्याचा ऱ्हास न होऊ देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारीच नव्हे तर कर्तव्य आहे.

निसर्गाची किमयेचा अभ्यास करून मानवाने भौतिक प्रगती केली आहे. निसर्ग ही ईश्वराची निर्मिती आहे. पाणी नेहमी उतारा कडेच वाहते आणि समपातळीत राहते. अग्नीच्या ज्वाला वर आकाशाकडे जातात. झाडावरील पाने, फुले व फळे इत्यादी जमिनीवर किंवा पाण्यात खाली पडतात.

सर्व झाडे हवा शुद्ध करून जीवांना जगण्यास मदत करतात. निरनिराळ्या वनस्पती धान्य, फळे व फुले निर्माण करून सर्वांना अन्न पुरवितात. सूर्य सर्वांना नियमित उष्णता आणि प्रकाश देतो. ईश्वराने सर्व निर्माण केले आणि दिले, अगदी मोफत, कमीत कमी आपण या परमेश्वराचे प्रार्थना करून त्याला धन्यवाद द्यावा. निसर्गावर आपण प्रेम करून त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे "निसर्ग सुरक्षित तर मानव जीवित" सुरक्षित राहील हे कायम लक्षात ठेवावे.

K C Pande
लोकशाहीची रुजवणूक
esakal

निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष यांचा समावेश होतो. नैसर्गिक भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. निसर्ग भौतिक जगाची घटना आणि सामान्यत जीवनाशी संबंधित आहे. निसर्ग आपल्यासाठी एक अविस्मरणीय देणगी आहे.

नैसर्गिक गोष्टींमध्ये डोंगरातील भूगर्भातील दगड, माती जोडून आपल्या परंपरा ही यांचाही समावेश होतो, हेही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहेत. दगडाच्या अंतरंगामध्ये सौंदर्याची ही अद्भुत दुनिया जगासमोर आणण्यासाठी मी एक मात्र छोटा निमित्त ठरलो.त्यामुळे निसर्गाबद्दल मला भरभरून बोलावसे व लिहा वसे वाटते.

निसर्गाने आपल्याला सर्वांसाठी एक मोठ्या प्रकारचे बहुमूल्य असं आपल्याला जीवनाच्या आरोग्याच्या दृष्टीने बहुमूल्य देणगी आपल्या,सर्वांना अगदी मोफत दिलेली आहे.निसर्गाला कोणत्याही वेळेला पैसे आपल्याला द्यावे लागत नाही.त्यामुळे अगदी मोफत पैशाचा कोणताही विधीचा न विचार करता अगदी मोफत वेळच्यावेळी आपल्याला दिलेली देणगी म्हणजेच एवढी मोठी सृष्टी आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

K C Pande
प्रेरणादायी जीवनकथा
esakal

निसर्ग हा कलावंत आहे.तो वेगवेगळी कला आपल्याला प्रदान करतो आणि या कलेच्या जोरावर ते आपण मनसोक्त आनंद घेतो.तो आपले जीवन सुखकर होते.नैसर्गिक अनेक संसाधने आहे त्यांचा योग्य रीतीने वापर त्यांचे संरक्षण केले गेले पाहिजे. उदाहरणार्थ गारगोटी सारखी अद्भुत दुनिया मी जगासमोर जेव्हा आणली तेव्हा अशी काही दुनिया असते ही बहुतांशी लोकांना माहीत नव्हतं.पण आज ती सर्वश्रुत आहे.

पण त्यासाठी योग्य पाठबळ व लोकांनी जास्तीत जास्त याबद्दलचे ज्ञान समजून घेतले पाहिजे मी मला मिळालेले ज्ञान हे कधीही स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही.काही लोकांची सवय असते की आपले ज्ञान आपल्याजवळच ठेवायची इतरांना त्या ज्ञानाचा उपयोग झाला नाही पाहिजे, अशी वृत्ती असते पण जन्मजात माझ्यात ही वृत्ती कधीच नव्हती.आपल्या ज्ञानाचा सगळ्यात जास्तीत जास्त उपयोग समाजाला व देशाच्या जडणघडणीत झाला पाहिजे.असा माझा उद्देश कायम होता व आजही आहे.

निसर्गाचे संवर्धन नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाशी संबंधित आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी,सूर्यप्रकाश,वातावरण,खनिजे,जमीन वनस्पती,प्राणी भूगर्भातील सौंदर्य यांचा समावेश होतो.यातील काही संसाधनांचा अतिवापर आहे त्यामुळे ते वेगाने कमी होत आहे.निसर्गाचे संवर्धन महत्व आपण समजून घेतले पाहिजे.

पर्यावरणातील समतोल सुनिश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे.निसर्गाचे संवर्धन म्हणजे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिकरित्या होणाऱ्या संसाधनाची संवर्धन होय. निसर्ग आपल्याला पाणी जमीन सूर्यप्रकाश आणि झाडे वनस्पती देऊन आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करतो.

K C Pande
गृहिणी नव्हेच, मी गृहस्वामिनी!

या संसाधनाचा वापर विविध गोष्टींच्या निर्मितीसाठी केला जाऊ शकतो जे निश्चितपणे मानवी जीवन अधिक सोयीस्कर व आरामदाय बनविले आहे. दुर्दैवाने माणूस या संसाधनाचा वापर करण्याऐवजी त्याचा ऱ्हास कसा होईल यामागे जणू लागला आहे.

आपण कितीही म्हटलं निसर्गावर मानवाने विजय मिळविला आहे, पण हे खरे नाही. निसर्गाचे जतन केले पाहिजे, ते करणे जवळजवळ मानवी जीवन विसरत चालले आहे. परिणामी यातील बरीच संसाधने जलद गतीने नष्ट होत आहेत.

असेच चालू राहिले तर मानवाचे तसेच पृथ्वीवरील इतर सजीवांबरोबरच मानवी जीवन सुद्धा अडचणीत येईल निसर्गचे संरक्षण करणे म्हणजे जंगल जमीन, जलाशयांची संरक्षण, नैसर्गिक संसाधनाची संरक्षण यामध्ये खनिजे नैसर्गिक वायू यासारख्या संसाधनाचे संरक्षण म्हणजे सर्व मानवी वापरासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

याची खात्री करण्यासाठी अनेक मार्ग आहेत ज्या सामान्य माणूस निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत करू शकतो येथे अशा काही मार्गांचे तपशीलवार जर आपण जर विचार विनिमय केला तर जीवनासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

पशुपक्षी, पाने, फुले, फळे अशा प्रकारची अनेक झाडे व जीव असतात. झाडांमध्ये जशी झाडे झुडपे प्रवेश करतात त्याप्रमाणे आपण जर मानवी जीवनाशी तुलना केली तर प्रत्येक आपलं जीवनही झाडेझुडपे जसे असते तसेच तितक्या संकटातून जात असते.

त्याचप्रमाणे आपणही संकटातून जातो त्यामुळे एखाद्या विषयाकडे आपण संकट म्हणून न बघता त्या विषयाकडे प्रेरणा एक प्रकारची शिकवण म्हणून बघितले पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आपल्याला प्रेरणा म्हणून जीवन एक प्रमाणे मनसोक्त जगले पाहिजे.

जीवनाचे एक कलात्मक दर्जा घडविण्यासाठी निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण निसर्गाची जतन करणे आपल्या हातात आहे निसर्ग आपल्यासाठी सृष्टी आहे आणि ही सृष्टीची जतन करण्याची जबाबदारी व कर्तव्य आपल्या सर्वांचेच आहे.

K C Pande
‘गुण’कारी परसबाग : आपले ‘ऑक्सिपार्क’ आपल्या दारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com