कृत्रिम बुद्धिमत्ता : आपली मुले आणि भविष्य

K S Azad
K S Azadesakal
Updated on

लेखक : के. एस. आझाद

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे. म्हणजेच सुरवातीच्या आणि अलीकडच्या काळामध्ये जी म्हणून काही प्रगती आपल्याला दिसून येते, तो ठोस बदल म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स होय. 

वर्तमानकाळाला तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते. या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये सर्वांत परवलीची संकल्पना कुठली असेल तर ती म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स. सध्या कुठल्याही क्षेत्रात पेक्षा वेगवान बदल कुठे घडत असतील तर ते देखील याच क्षेत्रात आहेत.  (Saptarang latest marathi article by ks azad on Artificial Intelligence Our Children and Future nashik news)

K S Azad
स्वयंप्रेरणेने हवा व्यक्तिमत्वविकास!

वास्तविक जेव्हापासून नवनवीन मशीनरी उदयास येत होत्या तेव्हापासून काहीनाकाही प्रमाणात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान देखील हळुहळू उदयास येत होते. आता आगामी काळात तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा भाग व्यापणार आहे.

सध्याच्या काळात रोबोसारख्या मशिनरीची निर्मिती झाली आहे. हे रोबो मानवाप्रमाणे बोलतात, मानवाप्रमाणे कार्य करतात. तसेच ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या बुद्धीने कार्य करतो तसेच ह्या मशीनरी देखील स्वतःच्या बुद्धीने कार्य करतात, त्यालाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अविष्कार म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे शब्दशः मराठीत रूपांतर केले तर कृत्रिम बुद्धिमत्ता होय, हे आपला सर्वांना माहिती आहेच. या पृथ्वीतलावर केवळ मनुष्याच असा प्राणी आहे, जो बुद्धिमान समजला जातो.

ज्या प्राण्यांत किंवा मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता असते, अशा व्यक्तीला बुद्धिमान म्हटले जाते. तशी बुद्धी अनेक प्राण्यांमध्येही दिसून येत असली तरी बुद्धीतील विवेक केवळ मनुष्याकडे आहे. 

त्यामुळे मनुष्य बुद्धिमान प्राणी समजला जातो. परंतु आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाने केलेल्या अतोनात प्रगतीमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी देखील टेक्नॉलॉजी अस्तित्वात आली. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन मशीनरीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता बसवण्यात आली. ज्यामुळे मशीन्सला देखील देखील मानवाप्रमाणे स्वतःचे निर्णय घेण्याची विचार करण्याची शक्ती प्राप्त झाली.

आपण जेव्हा लॅपटॉप किंवा संगणकाच्या सहाय्याने काम करत असतो, तेव्हा आपण ज्या काही कमांड संगणकाला देतो, त्यानुसार आपले संगणक काम करते. परंतु कृत्रिम बुद्धिमतेद्वारे मशीन स्वतःहून निर्णय घेते. आपल्या बुद्धिमतेनुसार कमांड तयार करते, की पुढे काम काय व कसे करायचे आहे.

K S Azad
परीक्षेवर बोलू काही...

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी मानवनिर्मित आहे. मानवाने तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण एखाद्या मशिनरीला विचार करण्याची क्षमता देऊ शकतो, असा याचा थोडक्यात अर्थ मानायला हरकत नाही.

जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. वर्तमान काळामध्ये देखील सर्व क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. भविष्यामध्ये तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनणार आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर रिटेल, शॉपिंग, फॅशन, सिक्युरिटी, सर्वेलंस, स्पोर्ट्स एनालिसिस, मॅन्युफॅक्चरिंग व प्रोडक्शन अशा जवळपास सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे. वर्तमान काळात बरीचशी अशी क्षेत्र आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केला जातो.

टेस्ला ही कार बनवणारी जगातील आघाडीची कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरून ड्रायव्हरलेस कार बनवण्याच्या तयारीत आहे. यामधील सेन्सर्स प्रत्येक मिली सेकंदात हजारो डेटा पॉइंट कॅप्चर करते. कारचा वेग रस्त्यांची स्थिती, ट्रॅफिक बद्दलची माहिती या आधारे इच्छित स्थळी पोहोचणार आहे. 

गुगल मॅपमध्ये एआय वापरले. ज्यामुळे प्रवास करणे आता सगळ्यांसाठी कमालीचे सोयीचे झाले आहे. क्रूझ ही देखील एआय वापरून मोठ्या शहरातील लोकांना रोबोटॅक्सी सेवा देणारी पहिली कंपनी आहे. अनेक उदाहरणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत देता येतील.

सध्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करुन ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

K S Azad
बघ्यांची गर्दी

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक संस्था सुद्धा आहेत, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी शिक्षण दिले जाते.

अनेक शैक्षणिक संस्थांना आता परिणाम आधारित शैक्षणिक साधनांचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे उच्चशिक्षण पद्धती हळूहळू पारंपरिक शिक्षणाच्या कोषातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.

ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाइन लिंक्स, फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियंत्रण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणता येणे शक्य आहे.

डिजिटल गोष्टींमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात.

एआय आधारीत नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास होत आहेत. उपयोजनांची गती देखील झपाट्याने वाढली आहे. आत्तापासून, एआय शक्यतो प्रतिमा प्रक्रिया मिनिटांत किंवा काही सेकंदात प्रशिक्षित करु शकते.

ज्या कामांना पूर्वी काही तास लागायचे, ते आता काही सेकंदांवर आले आहे. एका अहवालानुसार, एआय नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे, भविष्यात देखील राहणार आहे. अधिकाधिक कंपन्या जगातील सर्वांत प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वोत्तम संभाव्य परिणाम मिळविण्यासाठी कुशल कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात आहेत.

एआय तंत्रज्ञान पोझिशन्सपैकी, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी म्हणजे मशीन लर्निंग, डीप लर्निंग. गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता पाच पटीने वाढली आहे. नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक एआय करिअरकडे आकर्षित होत आहेत.

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी उद्योगकेंद्रित वास्तविक प्रकल्पांचा अनुभव असलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) पदवीधर पुरवणे काळाची गरज आहे. भारताने अलीकडेच अर्थकारणातील अनेक क्षेत्रांमध्ये एआय पुरवण्यास वेगाने वाटचालीस सुरुवात केली आहे.

K S Azad
एकमत हाच लोकशाहीचा मूळ स्वभाव

आपल्या देशाची लोकसंख्या पाहता आधुनिक तंत्रज्ञाचा अर्थकारणावर होणारा परिणाम लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एआय संरक्षण आणि सुरक्षेबाबतच्या नवकल्पनांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच त्याचा देशाच्या भविष्यावरही परिणाम होऊ शकतो.

येणाऱ्या काही वर्षांमध्ये अब्जावधी तरुण नोकऱ्या शोधण्यासाठी सज्ज होणार आहेत. या तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या योग्यतेच्या नोकऱ्या पुरवणे हे जगभरातील नेत्यांसमोरील मोठे आव्हान असेल.

त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. त्यामुळेच शालेय जीवनातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल विद्यार्थ्यांना माहिती होणे, ही मुले या विषयांत पारंगत होणे गरजेचे आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात तरी या विषयावर दुसरा काही पर्याय नाही.

कोरोनामुळे देशात आणि परदेशात करिअरच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आता बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. जर तुम्ही आयटी क्षेत्रातील नवीन क्षेत्रात करिअरचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळून भविष्य उज्ज्वल करु शकता.

भविष्यात या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. तसेच या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या उत्तम संधी आहेत. जर तुम्हीही भरघोस पगाराची नोकरी करु इच्छित असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात पारंगत व्हायलाच हवे.

शालेय अभ्यासक्रमात आर्टिफिशल इंटेलिजन्स हा मुख्य विषय आहे. हा विषय मुलांना केवळ सर्जनशील बनवतो, असे नाही तर मुलांची कल्पनाशक्ती, तार्किक विचार, समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. 

झपाट्याने बदलणाऱ्या जगाची आपल्या मुलांना लहानपणापासूनच ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा विषय सुरुवातीपासूनच समाविष्ट केलेला आहे, किंबहुना आगामी काळातील प्रमुख संस्थांमधील शिक्षण याच दिशेने जाणारे असेल, यात तीळमात्रही शंका नाही. 

(लेखक क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आहेत.)

K S Azad
आयुष्याचा धबधबा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com