दृष्टिकोन : पाणी आणि पाण्यासाठी हवे सर्वकाही

Rajaram Pangavane
Rajaram Pangavaneesakal
Updated on

लेखक : राजाराम पानगव्हाणे

निसर्गामधून आपल्याला बऱ्याचशा वस्तू मिळतात व आपल्या गरजा पूर्ण होतात. निसर्ग आपल्याला कसलाही मोबदला न घेता आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो. पाणी ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. 

पाण्यामुळे सर्व सजीव जिवंत आहेत. तसेच झाडे, पशू, पक्षी आणि इतर सर्व गोष्टींसाठी पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे पाणी हे पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे.  

(saptarang latest marathi article by rajaram pangavane on Water and everything for water nashik news)

Rajaram Pangavane
स्वयंप्रेरणेने हवा व्यक्तिमत्वविकास!
esakal

पृथ्वीवरील संपूर्ण जीवनचक्र पाण्यावर अवलंबून आहे. याशिवाय अन्नसाखळी देखील पाण्यावरच अवलंबून आहे. कारण पृथ्वीवरील कोणताही जीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. किंबहुना पाण्यामुळे पृथ्वीवर जीवन फुलू शकले. म्हणून माणसाच्या अत्यंत मूलभूत गरजांमध्ये पाण्याचा समावेश हा ओघानेच केला जातो.

आपल्या पृथ्वीतलावर एकूण ७१ टक्के पाणी आहे. परंतु त्यातील काही टक्केच म्हणजे अवघे तीन टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे सध्याच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषणामुळे पाणी दूषित होत चालले आहे, म्हणून पाण्याचे महत्व जाणून पाण्याचा योग्य वापर करणे आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाची गरज बनली आहे.

व्यक्तीच्या जीवनात आणि प्रत्येक सजीवासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी जपून वापरले पाहिजे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नसल्याने पाण्यालाच जीवन म्हटलेले आहे. हे महत्व जाणून सर्वसामान्यांमध्ये पाण्याच्या संबंधित जनजागृती करायला हवी‌.

पाणी तिथे वस्ती असं आजपर्यंतचा मानवी इतिहास सांगतो. आत्तापर्यंत पाण्याचा स्त्रोत पाहूनच माणसाने त्याभोवती वस्ती केली आहे. शहरांच्या बाबतीत आधुनिक जगात हे चित्र बदलले. माणसाकडे तंत्रज्ञान आले आणि नदीचे पाणी अडवून मोठा जलसाठा करण्याचे व ते दूर पोहोचवण्याचे तसेच भूजलातील पाणी साठ्याचा उपसा करण्याचे तंत्र त्यास अवगत झाले.

हल्ली शहरांलगत कारखाने असतात. त्यामागचे कारण म्हणजे कारखान्यांसाठी पाणीपुरवठ्याची सोय व्हायला हवी. मात्र यामुळे नदी, नाल्यांची व पावसाच्या थेंबांची किंमत कमी झाल्यासारखे जाणवते.

Rajaram Pangavane
परीक्षेवर बोलू काही...

मूळ स्त्रोताची परवा न करता पाण्याचा वारंवार वापर मानव करू लागला. त्यामुळे पाणीटंचाई जाणवू लागली, परिस्थिती बिकट होऊ लागली, हे आता वास्तव बनले आहे. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचे बनले आहे.

आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे. माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत, त्यात हवा, अन्न, वस्त्र, घर व पाणी. त्यापैकी सर्वांत मूलभूत गरज म्हणजे पाणी. जलाचे अस्तित्व असलेला आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे.  पृथ्वीचा ७१ टक्के भाग जलाचा असून २९ टक्के भाग जमिनीचा आहे.

पाण्याचा वापर कसा करावा आणि त्याची गरज कुठे आहे, याचा आपण विचार आणि योग्य नियोजन करायला हवे. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय? आपल्या गावातील, परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का पाणी लागत? मग यासाठी काटेकोर जलव्यवस्थापन हे करायलाच हवे. त्यात उद्याचाही विचार हवा. 

उपलब्ध पाण्याचे प्रमाण त्याची उपयोगीता व उपभोगीता म्हणजे प्रत्यक्ष वापर. यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय. जलसंरक्षण, संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जलव्यवस्थापन होय.

नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुद्ध करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रांमध्ये सुरुवात झालेली आहे. तसेच गंगा-कावेरी नद्या जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारने हाती घेतला आहे.

आपली जी जलउपब्धता आहे, त्यानुसार गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठ्यासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन, स्प्रिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्ट्या जी पध्दत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाण हे ठरविले जाते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Rajaram Pangavane
बघ्यांची गर्दी

जागतिक स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर जल उपलब्धतेचे सर्वेक्षण केले जाते. जलस्त्रोत आहेत त्यात वर्षभर असणारे पाणी, ऋतुमानानुसार जल प्रमाणात होणारा बदल व पाण्याचा दर्जा याचा विचार त्यात केला जातो.

एखाद्या नदीत वर्षभर व ऋतूनुसार कोठे व किती पाणी उपलब्ध असते? त्या नदीला पाणी कोठून येते? नदीप्रमाणेच नैसर्गिक तळी व तलावांचा विचार होतो. नैसर्गिक तळी क्षार मुक्त असल्याने त्याचा उपयोग होतो. तसेच प्रदूषणामुळे नदी व तळ्यांचा पाण्याचा दर्जा कमी होतो. भरपूर पाण्याची उपलब्धता म्हणून गंगा, सिंधू, कावेरी, ब्रम्हपुत्र, कृष्णा, गोदावरी, नर्मदा ही भारतातील खोरी प्रसिद्ध आहेत.

पाणी व्यवस्थापनात उपलब्धता बघितल्यावर गरजांचा अंदाज बघावयास हवा. प्राचीन संस्कृती नदीकाठावर विकसित झाल्या. तंत्र प्रगतीने नदी नसलेल्या भागातही मानवी वस्त्या वाढल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे पाण्याची गरज वाढली. त्यातून निर्माण होणाऱ्या स्थलांतरामुळे व्यवस्थेवर दिवसागणिक ताण वाढत आहे.

पाणी पुरवणार्‍या व्यवस्थापनासमोर प्रश्‍न निर्माण होतो.अडचणी निर्माण होतात. मग त्यातून संघर्ष सुरू होतो. आपल्याकडील कृष्णा-कावेरी पाणी तंटा सुरूच आहे. इतर स्थानिक स्वरूपातील जलवाटप संघर्ष देखील वर्षानुवर्षे चालूच असतात.

हे सर्व करत असताना आपल्याला कोणत्या अडचणी भेडसावतील? त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो? याचा आपण विचार करायलाच हवा. अडचणी निर्माण करणारा मानवच असतो व त्यावर तोडगा काढणाराही मानवच आहे.

सर्व प्राणी-पक्षी-पशू यांना पाण्याची गरज असते. परंतु माणसाच्या गरजा सतत वाढत आल्या आहेत. पूर्वी पाणी असेल तेथेच वस्ती असायची. पण आता वस्ती असते तेथे पाणी पुरवठा करावा लागतो. म्हणून जलव्यवस्थापनात मोठी अडचण निर्माण होते.

तसेच पाऊस हा लहरी असतो. त्याचे वाटपही समान नसते. तो कधी खूप पडतो म्हणून महापूर येतो तर कधी अजिबात पडत नाही म्हणून शेतकर्‍याला आकाशाकडे डोळे लावून वाट बघत बसावे लागते. त्यामुळे जलव्यवस्थापन अधिक बिकट बनत जाते. 

Rajaram Pangavane
एकमत हाच लोकशाहीचा मूळ स्वभाव

भावी जीवनासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी सर्वांनी या विषयावर चिंतन आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आलेली आहे. सर्वांचा सहभाग असल्याशिवाय केवळ शासन-प्रशासनावर अवलंबून राहून या विषयाकडे पाहिले, तर हाती केवळ निराशाच येणार आहे.

त्यामुळे सकारात्मक भावनेने सर्वांनी यात योगदान देण्याची गरज आहे. जलव्यवस्थापनासाठी काही उपाययोजना सर्वांच्या सहकार्याने करता येणे नक्कीच शक्य आहे. 

१. नव्या जलस्त्रोतांचा शोध घेणे

२. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती व उद्योगांचे नियोजन करणे

३. जल वापरात घट करणे

४. पाणी वाया जावू न देणे

५. परिसरात वनीकरण करणे

६. सर्व प्रकारची प्रदूषणं रोखणे

७. पावसाचे घरावर व छतावर पडणारे पाणी योग्य त्या रितीने साठवून वापर करणे. जलपुनर्भरणासाठी पुढाकार घेणे

८. जलवाटपासाठी वा संरक्षण, संवर्धनासाठी योग्य तंत्र व साधने वापरणे

९. जनजागृती करणे, प्रभात फेर्‍या काढणे, वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध करणे, चित्र प्रदर्शन भरवणे, घोषवाक्य तयार करणे, सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानाद्वारे पाण्याबद्दल जनजागृती केल्यास फार मोठ्या प्रमाणावर क्रांती घडू शकते. कारण हे असे माध्यम आहे की काही क्षणात कोट्यावधी लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. 

याशिवाय देखील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आपापल्या पातळीवर पाण्याच्या संदर्भात जनजागृतीचे कार्य करत आहे, त्या कामात आपण सर्वांनी सहभाग नोंदवायला हवा. त्यातून हा जलसंस्कार पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होईल.

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत.)

Rajaram Pangavane
आयुष्याचा धबधबा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com