

लेखक : राजाराम पानगव्हाणे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे तर खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचे गुरू मानले जातात. अनेकविध क्षेत्रांमध्ये त्यांनी व्यवस्थापनाची सूत्रे चपखल वापरली. आजही छत्रपती शिवाजीराजांचे उदाहरण देश-परदेशांतील विद्यापीठांमध्ये व्यवस्थापनाच्या अनुषंगाने दिले जाते. राजांच्या व्यवस्थापन तंत्रावर अनेक तज्ज्ञ आजही अभ्यास करत आहेत.
संरक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये राजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आजही अभ्यास केला जातो. ती सूत्रे अमलात आणली जातात. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Chhatrapati shivaji maharaj management skills nashik news)
राजांची संपूर्ण कारकीर्दीत व्यवस्थापन कौशल्याचा क्षणोक्षणी अचूक वापर केल्याचे दिसून येते. मर्यादित साधनसामग्रीमध्ये अधिकाधिक यश कसे मिळवावे, यासाठी छत्रपतींच्या व्यवस्थापन कौशल्याचा दाखला दिला जातो.
स्वराज्यासाठी मावळ्यांचे संघटन, कमी सैन्यदलासाठी आखलेली गनिमी काव्याची स्वतंत्र युद्धनीती, कौशल्य ओळखून केलेली सैन्यनिवड, शत्रूच्या गोटातील व प्रजेतील माहिती काढण्यासाठी केलेली हेरगिरी, दुर्गम डोंगरकड्यांवरील गड-किल्ले यांची निर्मिती, भविष्यात शत्रू समुद्रमार्गे येणार याची दूरदृष्टी असल्याने केलेली दुर्गनिर्मिती, लढाया जिंकण्यासोबतच परिस्थिती विरोधात असताना केलेले तह अशा अनेक पैलूंमुळे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यवस्थापन गुरू ठरतात.
‘शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीच्या सर्व लढाया या व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहेत. हवामानशास्त्र, भौगोलिक व प्रादेशिक परिस्थितीचा अभ्यास करून युद्धनीती ठरविणे हे महाराजांच्या समयसूचकता व परिस्थितिजन्य दूरदृष्टीने घेतलेले निर्णय म्हणजे व्यवस्थापनाचे अत्युच्च उदाहरणे आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सैन्यदलात मावळ्यांची, त्यांच्या कौशल्याची पारख करून केलेली निवड व वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या यात त्यांचा हातखंडा दिसून येतो. आजच्या व्यवस्थापनात शास्त्रामध्ये सर्वांत प्रचलित असलेली संकल्पना म्हणजे ‘राइट मॅन राइट जॉब’ या संकल्पनेचे मूळ सुद्धा महाराजांच्या व्यवस्थापनात आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कौशल्यानुसार काम देणे किंवा जबाबदारी देणे. जात, पंथ, भाषा व प्रदेशाची अस्मिता दूर करून मावळ्यांमध्ये स्वराज्याची दुर्दम्य इच्छा, आकांक्षा निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे शिवाजी महाराज.
पोर्तुगीज व इंग्रज समुद्रमार्गे येत असल्याचे दिसून येताच समुद्र आरमार व दुर्गउभारणी हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. केवळ आदेश न देता स्वतः सर्वांच्या पुढे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता, योग्य निर्णय, लढवय्येपणा, अचूक व्यवस्थापन कौशल्याचा सर्व व्यवस्थापनशास्त्र शिकणाऱ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना आदर्शवत असे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये झाला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील ध्येयधोरणे, राजनीती, समाजनीती, अर्थकारण, व्यवस्थापन तंत्र, पर्यावरण संवर्धन, मानवतावाद यांचा आजच्या काळातही उपयुक्तता असून, त्यामुळे ते ‘आदर्श व्यवस्थापन गुरू’ ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, लोककल्याणकारी धोरणे, परकीय शक्तींना थोपविण्याची क्षमता, कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि शौर्य पाहता ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कोणतीही लढाई, तह, स्वराज्य विस्तारामधील त्यांचे नियोजन हे व्यवस्थापनशास्त्राला पूरक असेच होते. नेतृत्वगुण, रसद पुरविण्याचे तंत्रज्ञान, दळणवळणाचे व्यवस्थापन, स्वराज्य स्थापनेसाठीचे मंत्रिमंडळाची व सैन्यदलांची उभारणी याची अनेक उदाहरणे व्यवस्थापनशास्त्रातील दूरदृष्टी शिकविण्यासाठी उपयोगी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.