
लेखक : राजाराम पानगव्हाणे
एखादे संकट आले असता परिस्थितीला दोष देत बसले, की मन निराश होते; पण देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे, असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही.
अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंतःस्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यामध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते.
आपण सारासारपणे निरीक्षण केले तर ज्याच्यात सकारात्मक विचार जास्त आहेत अथवा ती भावना अधिक प्रमाणात आहे, तो अध्यात्माशी कुठल्या ना कुठल्या माध्यमाने जोडलेला आहे हे आपणास लक्षात येईल. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Guru Mantra of Happy Satisfied Life Spirituality nashik)
अलीकडच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत आपले आयुष्य समस्यांनी वेढलेले आहे. जन्माला येणाऱ्या बाळापासून ते वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक जण अप्रत्यक्षरीत्या व प्रत्यक्षरीत्या तणावाचा सामना करीत असतो.
तणावापासून मुक्त होण्यासाठी मनाची शक्ती सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी अध्यात्म हा अलीकडचा काळात एकमेव पर्याय आहे. अध्यात्माला शास्त्रीय आधारसुद्धा आहे.
अध्यात्म, ध्यानधारणा, श्रद्धा, देवधर्म, पूजाविधी विविध संस्काराच्या माध्यमातून मनुष्य आपल्याला मनःशांती मिळण्याचा प्रयत्न करीत असतो.
प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचे स्वातंत्र्य आहे, याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. पण अध्यात्म व श्रद्धा हे परस्पर पूरक आहेत. अध्यात्म व अंधश्रद्धा यामध्ये धूसर रेषा आहे. ती आपणास ओळखता आली पाहिजे.
अध्यात्माद्वारे मनःशांती प्राप्त होते. अध्यात्म स्वीकारताना किंवा ते आचरणात आणताना निरनिराळ्या क्रिया-प्रक्रिया करीत असताना त्यामध्ये नियमितपणा आवश्यक आहे. धरसोड वृत्ती नसावी. यामध्ये अध्यात्म गुरू हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
आपण आज अध्यात्माची तत्त्वे स्वीकारताना ते कुणाकडून घेत आहोत, हेही बघितले पाहिजे. समाजामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या व्यक्ती व प्रवृत्ती आढळतात. काही योग्य आहेत, तर काही अयोग्यही आहेत, याचा अर्थ सर्वच योग्य व सर्वच अयोग्य, असे नव्हे.
अध्यात्म या संबोधात आद्य + आत्मन् अशी दोन पदे आलेली दिसतात. यातील ‘आद्य’ म्हणजे आधीचा व ‘आत्मन्’ म्हणजे आत्मा.
अध्यात्म या शब्दाची फोड अधी म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आपल्या आत्माचे ध्यान करणे.
माणसाला माणूस बनवणे, दैनंदिन जीवनात होणाऱ्या मानसिक व शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे, हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे.
संकटांशी सामना करण्याची ताकद
अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनःशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो.
ही सगळी चर्चा करण्याचे कारण असे, की आजच्या संघर्षमय जीवनात, मनःशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो.
मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विवाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले आहे.
समाधानी आणि निराशावादी
एखादे संकट आले असता परिस्थितीला दोष देत बसले, की मन निराश होते; पण देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे, असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही.
अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यामध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते.
वृद्धापकाळात येणाऱ्या नैराश्याचा व उत्साह कमी जाणवणाऱ्या घटकांचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर सामना केल्यास मन प्रफुल्लित होते.
माझ्यात काहीतरी कमी आहे, मी कुणाचे तरी वाईट केले, माझ्यावर अचानक संकट कोसळले, मी केलेल्या कुठल्यातरी चुकीची मला शिक्षा मिळत आहे, अशी मनात भावना प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी जागृत होत असते, जाणवते. असे मानणाऱ्याला जास्त निराश वाटते.
याउलट आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’, असे मानणारा कमी निराश होतो.
अध्यात्माचे फायदेच फायदे
आपण सारासारपणे निरीक्षण केले तर ज्याच्यात सकारात्मक विचार जास्त आहेत अथवा ती भावना अधिक प्रमाणात आहे, तो अध्यात्माशी कुठल्या ना कुठल्या माध्यमाने जोडलेला आहे, हे आपणास लक्षात येईल.
कॅन्सरसारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो.
आपत्तीनंतरच्या काळात आध्यात्मिक आणि धार्मिक गुरू संत उपदेश-प्रवचनांचा अतिशय सकारात्मक उपयोग होतो. या प्रक्रियेत सामूहिकतेची भावना आणि एकमेकांना मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो.
मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.
निसर्गात मानसिक शांती
देऊळ, देवळातले वातावरण, भजन, कीर्तन, नामस्मरण, चर्च, मशिदी, बुद्धविहार यामधील वातावरणाचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो.
स्वतःकडे बघण्याची सवय होते. लक्ष केंद्रित करता येते. वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते, अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. निसर्गाच्या सान्निध्यातही एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते.
आपल्या आत डोकावून पाहा
प्रत्येकाने आपल्या आत पाहण्याची गरज आहे. कारण आपल्याला जीवनात समाधान आणि शांती आणि आनंदाची भावना आहे. जेव्हा जग आपल्याला देत असलेल्या विविध प्रकारच्या दुःखामधून आतमध्ये पाहण्यासाठी आपल्याला बोलावले जाते तेव्हा शेवटी आपण हाक ऐकतो आणि आत डोकावतो.
केवळ अध्यात्मिकरीत्या आत्मसात करूनच आपण आपल्या मूल्यप्रणालीला जे वास्तविक आहे त्याच्याशी पुन्हा जुळवून घेऊ शकतो आणि आपल्या बाहेरील गोष्टींवर विश्वास ठेवण्यापासून आपल्याला परमशांती आणि आनंद मिळेल.
सकारात्मक विचार रुजवा
जीवनात अध्यात्माकडे लक्ष न देता आपण आनंद शोधत असतो. मात्र तो आपल्या जीवनात कधीही दीर्घकाळ टिकत नाही. अध्यात्म म्हणजे तुम्हाला जीवनात, आशा, आराम आणि आंतरिक शांती लाभण्याचा मार्ग. अनेकांना धर्म, अध्यात्म काही लोकांना ते संगीत, कला किंवा निसर्गाशी जोडलेले आहे.
अध्यात्मा आरोग्याशी कसा संबंध आहे, हे निश्चितपणे माहिती नाही. तथापि, त्याद्वारे स्वतःचे शरीर, मन आणि आत्मा जोडलेले आहेत. यापैकी कोणत्याही एका घटकाचे आरोग्य इतरांवर परिणाम करतात.
काही संशोधनात श्रद्धा आणि तुमची तंदुरुस्ती यातील संबंध दाखवतात. धर्म, ध्यान आणि प्रार्थनेतून सकारात्मक विश्वास, सांत्वन आणि आरोग्यासाठी आरोग्य मदत करू शकते.
सामाजिक, सामुदायिक सेवा किंवा स्वयंसेवक करणे, प्रार्थना करणे, ध्यान करणे, भक्तिगीते गाणे, प्रेरणादायी पुस्तक वाचणे, निसर्ग फिरणे, विचार करण्यासाठी शांतता, योग करणे, खेळणे किंवा धार्मिक सेवेत सहभागी होत सकारात्मक विचार मनात रुजविणे प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.