भाषासंवाद : नवे वर्ष, नवे सदर, नवी भूमिका!

आपणही आपल्या भाषेकडे संवाद म्हणून बघावे, तिचा आकार शोधावा, त्या आकारातील विलोभनीय वळणे गिरवावीत आणि ती घडवावीत असे कुतूहल ही नवी लेखमाला लिहिताना मी मनात धरले आहे.
Trupti Chavare Tijare
Trupti Chavare Tijareesakal

लेखक : तृप्ती चावरे - विजारे

वर्षभरापासून, कला, कलाकार आणि कलाविचार यांची एक सुंदर वैचारिक गुंफण शिकविणारी 'नाशिक कला कट्टा' ही लेखमाला 'सकाळ' मधून लिहिण्याची संधी मला खूप काही शिकवून गेली.

लेखमालिकेचे नाशिकच्या कलाक्षेत्राने भरभरून स्वागत आणि कौतुक तर केलेच, पण त्याचबरोबर कलाकारांच्या मुलाखतींमधून व्यक्त होणा-या बहुविध विषयांनी आणि भाषेने मला जीवनमूल्ये शिकविणारा परिपक्व, भरगच्च आणि समृद्ध असा आशयही दिला.

आशयाच्या या खिडकीतूनच मला एका नव्या विषयाचे क्षितिज आता खुणावते आहे ... ते म्हणजे, भाषानिर्मिती ते भाषासमृद्धी यांच्या मधोमध व्यक्त होणारा ‘भाषासंवाद’. हा नवा भाषासंवाद वाचकांच्या साक्षीने आणि सरस्वतीच्या कृपेने उत्तरोत्तर रंगत जावा अशी माझी अभिलाषा आहे.

प्रत्येक कला ही ज्याप्रमाणे एक भाषा असते त्याचप्रमाणे प्रत्येक भाषा हीदेखील एक कलाच असते. कलेकडे कलाकार 'संवाद' म्हणून बघतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या भाषेकडे संवाद म्हणून बघावे, तिचा आकार शोधावा, त्या आकारातील विलोभनीय वळणे गिरवावीत आणि ती घडवावीत असे कुतूहल ही नवी लेखमाला लिहिताना मी मनात धरले आहे. (saptarang latest marathi article by trupti chavare tijare on Language communication nashik news)

आवाज घडला तरच बोलीभाषा घडते असे जाणकारांचे मत आहे. आपली भाषा ओळखणे, ती वापरणे, आणि ती टिकविणे यासाठी आवाजाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

या लेखमालेचा उद्देश भाषेतील आवाज, उच्चार, अक्षर, शब्द, वाक्य, अर्थ, विचार, उच्चार, आणि भावार्थ असे भाषासंवादाचे विविध पैलू अभ्यासणे असाही आहे. हीच जिज्ञासा मनात धरून, भाषेची बोली, रचना आणि मांडणी घडविणाऱ्या विविध संवाद-पैलूंचे मूलमंत्र मी वाचकांच्या साक्षीने गिरविणार आहे.

मानवाला लाभलेले एक अवर्णनीय वरदान म्हणजे 'भावना'. प्रत्येकाच्या मनात, ती असतेच... पण प्रत्येकालाच ती नेमकेपणाने व्यक्त करता येईलच असे नाही. असे का होते? कारण अशा व्यक्ती भावना आणि आवाज यांचा संबंध लक्षात घेत नाही.

भावना व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे भाषा घडवावी लागते तसा आवाजही घडवावा लागतो. आवाज आणि उच्चार यांच्या क्षमतांवर काम केले, की भाषा खुलते. भाषण, संभाषण, श्रवण, लेखन आणि वाचन ही सगळी भाषा व्यक्त करणरी वेगवेगळी माध्यमे; पण मुख्य महत्त्व, मनात आलेली भावना आवाजातून आणि भाषेतून व्यक्त करण्याला आहे.

जो आपला आवाज आणि भाषा घडवितो, त्याचे मन घडते, त्याची भावना घडते; त्याचे व्यक्तिमत्व शुद्ध, स्वच्छ आणि सुंदर होत जाते. प्रत्येकाच्याच मनात खूप काही असते. पण मनातले हे 'खूप काही' जीवनात ‘व्यक्त’ होण्याला फार महत्व आहे. ‘भाष' म्हणजे बोलणे याचा अर्थ, भाषा ही प्रयोगदर्शक क्रिया आहे, जिच्यात आवाज हा मुख्य घटक आहे.

Trupti Chavare Tijare
लैंगिक समस्येवर बिनधास्त बोला!

आजकाल भाषातज्ज्ञ असे म्हणतात की, ‘भाषा’ ही केवळ एक लिपी नसून व्यक्तिमत्व विकासाचे ते एक प्रभावी साधन आहे, कारण व्यक्तिमत्व या शब्दातच ‘व्यक्त’ होणे असा अर्थ अभिप्रेत आहे.

आपल्या दर्शनी व्यक्तिमत्त्वावर शरीरसौष्ठव, राहणीमान आणि नीटनेटकेपणा या घटकांचा परिणाम होत असतो अगदी तसेच भाषेच्या सौष्ठवाचेही आहे, म्हणून व्यायामशाळेत जाऊन शरीरसौष्ठव ‘घडविण्याला’ जे महत्त्व आहे, ते भाषासंवाद अभ्यासाला आहे.

व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही प्रकारच्या मानवी मनाला धार लावणारे एकमेव शस्त्र म्हणजे भाषा. ‘अव्यक्ता’ला ‘व्यक्त’ करणे शक्य होते ते केवळ भाषेमुळे... ‘भाषे’चा परिणाम ‘मन’ नावाच्या न दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर कळत-नकळत होत असतो.

तेही चांगले वापरता यावे म्हणून भाषा घडविण्याचा हा प्रयत्न. स्वतःच, स्वतःसाठी केलेला... ज्याला व्यक्तिमत्व घडवायचे आहे, त्याने आधी भाषा घडवायला घेतली पाहिजे. ‘मलाही माझी भाषा अशीच घडवायची आहे’ अशी या लिखाणामागची माझी प्रामाणिक भावना आहे.

आपल्याला हा भाषाप्रवास सोबत करायचा आहे, कारण ज्याप्रमाणे श्रोत्यंशिवाय एखाद्या मैफिलीला अर्थ नसतो, त्याचप्रमाणे वाचकांशिवाय लेखक हा अपूर्ण असतो.

(क्रमशः)

Trupti Chavare Tijare
भारतीयांच्या परदेशगमनाचं अपयश कोणाचं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com