स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास...

Indian Air Force
Indian Air Forceesakal

लेखिका - कामिनी सूर्यवंशी

दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय. पण खर्‍या अर्थाने आजच्या महिला सक्षम आहेत का? यावरही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. भारत हा देश अनेक शतकापासून ते आजपर्यंत पुरुष प्रधान संस्कृतीने ग्रासला आहे. स्त्रीजन्म घेतला म्हणून तिला संकोच वाटावा अशी परिस्थिती निर्माण झालेली. तेराव्या शतकात संत जनाबाई यांनी "स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास" असे स्त्रियांना बळ देणारे विधान आपल्या अभंगातून सांगितले.

राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई इत्यादिंच्या पुण्याईने कर्तृत्वाच्या प्रेरणेने प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत, परंतु काही विवाहित महिला आजही चूल आणि मूल या गुंत्यात का अडकल्या आहेत? सर्व प्रकारचे दडपण घेऊन स्त्रिया कशाबशा जगतात. अनेक प्रकारची बंधने त्यांच्यावर लादली गेली आहेत. या बंधनांचे पालन समाजासाठी करायचे? की कुटुंबासाठी? हा प्रश्न अजूनही उलगडला नाहीये !
आपल्याला अभिमान वाटावे, असे आपले ज्योतीबांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले. त्यानंतर सावित्रीबाईंच्या मदतीने मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले हे करत असताना, सावित्रीबाईंचा समाजाने खूप छळ केला. त्यांची पाय मागे ओढण्यात आली.त्यांचे विविध कारणाने शोषण केले. त्यांचा छळ केला. परंतु त्या थांबल्या नाही. त्यांचा आदर्श नजरेस ठेवून आपण सावित्रीच्या लेकी आपण स्वतःच्या व समाजातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, भावनिक, तसेच विकासाचा पाया उंचावला पाहिजे.

Indian Air Force
गोष्ट माझी : मोठा पुरस्कार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात- कोणत्याही देशाची किंवा समाजाची प्रगती जर मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगती वरून मोजावी. मला त्यांचे विधान फार मौलिक वाटू लागते. ज्यावेळी एक स्त्री शिकते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित बनवते.भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुष समानतेचा हक्क महिलांना दिला आहे. ही घटना महिलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
1942 मध्ये नागपूरच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस हजार महिलांसमोर भाषण करताना ते म्हणाले, लग्न केलेल्या प्रत्येक मुलीने आपल्या नवऱ्याला आदराने, प्रेमाने, नम्रपणे सांगितले पाहिजे की बाबा! मी तुझी मैत्रीण आहे, आपण समान आहोत मी, तुझी दासी नाही किंवा गुलाम नाही.
आजही महिला ही प्रगतीच्या दिशेने जाताना दिसते. मात्र काही प्रमाणात तिचे पाय मागे खेचले जातात, परंतु अशा शोषकप्रवृत्तीला आपण प्रश्न केला पाहिजे की, या संकुचित मानसिकतेला बळी पडण्यासाठी माझ्या सावित्रीने माझ्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले का ? किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी मला समानतेचा हक्क दिला आहे का? समाज आजही पाहिजे तसा बदलला नाही. आजही महिलांना पुरुष प्रधान संस्कृतीचा, शोषणाचा सामना करावा लागतोय. जगभरात जर स्त्री पुरुष समानतेचा आलेख अभ्यासला तर प्रत्येक बाबतीत भारत आजही मागे आहे. हा आलेख आपल्याला बदलावा लागेल.

आजही तिला तिचे स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. तिने मत मांडण्याचा प्रयत्न केला तर तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोचविले जाते. तिच्या संस्कारांवर प्रश्न केले जातात, ती संसार करेल का नाही असा संकोच व्यक्त केला जातो.
माझ्या जीवनातील दिशादर्शक ठरणारी महिला म्हणजे चाळीसगाव येथील दृष्टी फाउंडेशनच्या संचालिका, माझ्या शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील मॅडम...सौ. पाटील यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना एकदा म्हटल्या होत्या, की मुलींनी लग्नाआधी सक्षम होणे खूप गरजेचे आहे...स्वतः पायावर उभे राहणे गरजेचे आहे... मला त्यांच्या मार्गदर्शनाने दिशा मिळत गेली...त्या नेहमी म्हणतात की महिलांना पाठबळ दिले पाहिजे. त्यांना दिशा दिली पाहिजे...पाटील मॅडम यांनी मला दिशा दिली, आणि मी संधीचे सोने केले..
भारतीय समाजव्यवस्थेत काही पारंपरिक पद्धतीने महिला शोषित ठरल्या आहेत.तरीही त्यांनी त्या शोषणावर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला. आपले कर्तृत्व सिद्ध करून आजही अनेक महिला आपली यशोगाथा सिद्ध करताना दिसताहेत. अशा कर्तृत्ववान महिलांची प्रेरणा माझ्यासारख्या तरुणीला मिळतेय...

Indian Air Force
क्लायमॅक्स : संपणारी टेप...!

मला लग्नापूर्वी अनेकदा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागला.. त्यावर मात करून आपण शिकावं नोकरीला लागावं आणि स्वतंत्र अशी पाऊलवाट निर्माण करावी, अशा हेतूने मी चाळीसगावच्या दृष्टी फाऊंडेशनमध्ये आली आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.. खरी दृष्टी मिळाली.. माझा शिक्षण ते भारतीय हवाई दलात नोकरी असा प्रवास झाला आहे. चिकाटी, ध्येय, आणि इच्छाशक्ती असेल तर नक्कीच आपल्याला मार्ग सापडतो. हे प्रत्यक्षात मी अनुभवले आहे. मी स्वीकारलेले क्षेत्र हे नव्या पिढीतील महिला निवडू शकतात. किंवा त्यांनी निवडले पाहिजे. असे मला वाटते. म्हणून ध्येयाची पराकाष्टा अवलंबली पाहिजे. अशी तमाम महिला वर्गाला मी आज महिला वर्गाला आवाहन करते आणि आज जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देते....माझ्या भगिनींना एक विनंती करते की "चला निश्चय करू या...सर्व महिलांनी सक्षम होऊ या..."

(लेखिका या चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असून नुकतेच त्यांची भारतीय हवाई दलात नर्सिंग स्टाफमध्ये निवड झालेली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com