गारगोटीचा संग्रह बघून परदेशी दांपत्य म्हणाले ‘ओ माय गॉड’

K C pandey Felicitation
K C pandey Felicitationesakal

लेखक : के. सी. पांडे

गारगोटी मिनरलच्या माझ्या व्यवसायाबद्दल आणि त्यातील यशाबद्दल अनेकदा मला वेगवेगळ्या लोकांकडून विचारणा होते, की तुम्ही हे सर्व कसे सांभाळता. अशावेळी मी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना आणि असलेल्यांना सांगू इच्छितो, की आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

इतर ठिकाणी मन विचलित होऊ देऊ नये. प्रामाणिकपणा, कल्पकता, व्यावसाकता दाखवावी, आपणास निश्चित यश मिळेल. फक्त यश मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नये, जमिनीवरच राहावे एवढेच... (saptarang marathi articles by K C Pandey gargoti museum nashik Latest Marathi News)

गारगोटी मिनरलमधील माझा छंद व व्यवसाय याविषयी अनेकांना कुतूहल वाटत असे. जगावेगळा छंद आणि त्यातून मिळवलेले यश यामुळे बरेच लोक आश्चर्यचकित होत असे. माझ्यावर प्रेम करणारा हा सर्व चाहता वर्ग यांच्यासाठी गारगोटी ही मात्र नवीन होती.

भले ती कितीही लाखो वर्ष जरी पूर्वीची असली, पण त्यांचे असे मत होते, की जगासमोर मीच प्रथम मांडली. पण या अगोदरही गारगोटीचे अस्तित्व होतेच व ते सर्वांना दिसतही होते. परदेशात याच्यावर काही ठिकाणी कामही सुरू होते.

esakal

काही तर व्यवसायही करीत होते. व्यावसायिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. यात काही चांगले तर काही वाईटही, काही मनस्ताप देणारे, तर काही उभारी देणारे असतात.

जो माझा चाहता वर्ग झाला होता तो सर्व माझ्याशी संबंधित मला ओळखणारा होता. पण जेव्हा जागतिक पटलावर आपण काम करतो तेव्हा आपण त्या क्षेत्रातील संबंधित घटकांची स्पर्धा करीत असतो. व्यवसायाची देवाणघेवाण करत असतो.

त्यामुळे तेथून येणारे अनुभव हे आपल्या व्यवसायावर फार दुरोगामी परिणाम करणारे असतात. गारगोटी मिनरलमधील माझा छंद व व्यवसाय याविषयी अनेकांना माझ्याबद्दल कुतूहल वाटत असे.

जगावेगळा छंद आणि त्यातून मिळवलेले यश यामुळे बरेचसे लोक आश्चर्यचकित होत असे. माझ्यावर प्रेम करणारा हा सर्व चाहता वर्ग यांच्यासाठी गारगोटी ही मात्र नवीन होती. भले ती कितीही लाखो वर्ष जरी पूर्वीची असली पण त्यांचे असे मत होते, की जगासमोर मीच प्रथम मांडली.

पण या अगोदरही गारगोटीच्या अस्तित्व होतेच व ते सर्वांना दिसतही होते. परदेशात याच्यावर काही ठिकाणी कामही सुरू होते. काही तर व्यवसायही करीत होते. व्यावसायिक जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. यात काही चांगले तर काही वाईटही, काही मनस्ताप देणारे तर काही उभारी देणारे असतात.

K C pandey Felicitation
इतिहासाचे भवितव्य
esakal

जेव्हा गारगोटी मिनरल क्षेत्रातील एखादी तज्ज्ञ व्यक्ती या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम व व्यवसाय केलेली व्यक्ती जेव्हा आपली प्रशंसा करते, आपल्याला जागतिक दर्जाचा व्यावसायिक समजते, ती शाबासकी आपल्याला हजारो हत्तींचे बळ देणारी असते.

असंच काही माझ्याबद्दलही घडले. अमेरिकेतील एक ज्येष्ठ व्यावसायिक दांपत्य मिनरल क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करीत व व्यवसाय करीत आहे. या दांपत्यास मी भारतात येण्याचा व माझे गारगोटी संग्रहालय पाहण्याची विनंती केली. त्यांनी सिन्नर येथे संग्रहालयाला भेट दिली. ही व्यक्ती जागतिक पातळीवर काम करणारी आणि आपल्यापेक्षाही वरिष्ठ असल्याने काय प्रतिक्रिया येईल, ही धाकधूक होतीच.

ते गारगोटीत आले, सर्व गारगोटी बघितल्यानंतर त्यांना मी विनंती केली, की गारगोटी संग्रहालयात सिन्नरच्या शेजारीच माझं एक गुदाम आहे, त्यात मी संग्रहित केलेल्या गारगोटी एकत्र आणून त्याची जतन करीत असतो, ते तुम्ही बघावे.

आम्ही तिथे गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला गारगोटीचा संग्रह पाहून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. एवढा संग्रह त्यांनी कुठेही पाहिलेला नव्हता. ते बघून त्यांच्या तोंडातून ‘ओ माय गॉड’ असा शब्द निघाला. ते मला म्हणाले, ‘मी इतक्या वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. पण मिस्टर पांडे तुमच्या इतका व्यापक व मोठ्या प्रमाणात गारगोटी मिनरलचा संग्रह जगात कुठेही बघितलेला नाही.

या सर्व गारगोटी जगातील वेगवेगळ्या देशातील आहेत. यातील काही भारतातली आहेत. इतक्या दूरवरून तुम्ही या कशा आणल्या. तेव्हा मी त्यांना, ‘मी माझे काम प्रामाणिकपणे करीत असतो आणि प्रामाणिक कामात ईश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो’, असे सांगितले. असे अनेक व्यावसायिक जीवनातील अनुभव मला आले आणि त्यामधून मला स्फूर्ती मिळाली.

या माध्यमातून मी नवोदित उद्द्योजकांना सांगू इच्छितो, की आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. इतर ठिकाणी मन विचलित होऊ देऊ नये. प्रामाणिकपणा, कल्पकता व्यवसायात दाखवावी. आपणास निश्चित यश मिळेल. फक्त यश मिळाल्यानंतर हुरळून जाऊ नये. जमिनीवरच राहावे.

K C pandey Felicitation
कर्करोगाचा स्वभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com