तंत्रज्ञान आणि व्यवहारातला उपयोग

तंत्रज्ञानाचा विकास होणं या दोन गोष्टींमध्ये सुसूत्रता असणं आवश्यक होतं. ते घडून आल्यानं या शतकातल्या तिसऱ्या दशकात तंत्रज्ञानाची नवी क्षितिजं दिसत आहेत.
तंत्रज्ञान
तंत्रज्ञानSakal
Summary

संवादाची गरज जसजशी वाढू लागली तसतसा या तंत्रज्ञानात इतका बदल झाला की टाईपरायटर संग्रहालयापुरता उरला आणि टेलिग्राम हा इतिहास झाला. तंत्रज्ञानाचा मानवी व्यवहारात वापर आणि मानवी वर्तनावर परिणाम हा विषय भविष्यदर्शी म्हणून पाहिला जातो. गमतीचा भाग असा आहे की, इतिहासात पाहिल्याशिवाय भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा अंदाज येत नाही आणि माणसावर होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या परिणामांसाठीही पुन्हा इतिहासाकडेच धाव घ्यावी लागते.

तंत्रज्ञान
Mumbai Crime : कॉलगर्ल घरी येत नाही म्हणून केली शिवीगाळ; 42 वर्षीय व्यक्तीची गळा चिरुन हत्या

तंत्रज्ञान गरजेतून तयार होतं. गरजेतून शोध, शोधातून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातून विकास अशी प्रक्रिया गेल्या पाच शतकांच्या वाटचालीत वारंवार दिसत राहते. साधारणतः सतराव्या शतकापासून तंत्रज्ञानाचा विकास जलद गतीनं झाल्याचं दिसतं. त्याआधी तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हतंच असं मानणं सर्वस्वी चूक आहे. सतराव्या शतकापासूनच्या तंत्रज्ञानाच्या सुसंगतवार नोंदी उपलब्ध असल्यानं त्याबद्दल खात्रीनं सांगता येतं.

त्याआधीच्या तंत्रज्ञानाबद्दल अनुमानावर आधारित भाष्य करावं लागतं. सतराव्या शतकापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या आधी गृहनिर्माण, नगररचना, शेती, दळणवळण, वैद्यकशास्त्र, धातुशास्त्र अशा क्षेत्रांमध्ये जगभरातल्या अनेक भागांमध्ये प्रगती झाल्याच्या खुणा सापडत राहतात. सिंधू संस्कृती असो किंवा मेसोपोटामियन संस्कृती असो, मानवानं तत्कालीन गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा शोध घेतल्याचे आणि ते वापरात आणल्याचे दाखले आहेत.

तंत्रज्ञान
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

तंत्रज्ञान बदलतं कधी?

सर्वच तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होतो असंही नाही. काही स्वरूपाचं मूलभूत तंत्रज्ञान गरजा झटकन भागवतं आणि त्यानंतर शेकडो वर्षं त्या तंत्रज्ञानात बदलाचा वेग संथ राहतो. शेतीसाठीच्या नांगराचं मूलभूत तंत्रज्ञान गेल्या चार हजार वर्षांमध्ये अत्यंत संथ गतीनं बदलल्याचं संशोधन सांगतं.

नांगराचं उदाहरण अशासाठी घेतलं की, शेती हा मानवी उद्योगाचा सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा. झाडाच्या फांद्यांनी नांगरट करण्यापासून नांगरटीसाठी प्राण्यांची ताकद वापरण्यापर्यंतची प्रगती माणसानं केली. त्या प्रगतीच्या टप्प्यात नांगराचं तंत्रज्ञान बदलत गेलं.

जमिनीची नांगरट ही मूलभूत गरज भागल्यानंतर अचूकता, वेग, स्वयंचलितता असे विकासाचे टप्पे आले. तथापि, मूलभूत तंत्रज्ञान कायम राहिलं. कारण, मूलभूत तंत्रज्ञानानं नांगरटीतला वेळ आणि श्रम वाचवण्याची गरज भागवली होती.

इतिहासातून भविष्याचं अनुमान

तंत्रज्ञानविकासात अशी स्थिरता प्रत्येक क्षेत्रात येतेच असं नाही. दळणवळणासारख्या क्षेत्रानं जणू पंख बहाल केले आणि माणूस पृथ्वीबाहेर प्रवासाची स्वप्नंही सहज पाहू लागला. चूल मांडायची आणि अन्न तयार करायचं या रोजच्या गरजेतून स्वयंपाकघरात स्टोव्ह आला. केरोसिन-इंधनातून लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आला. बायोगॅसचेही प्रयोग झाले.

स्वयंपाकासाठी चूल हे मूलभूत तंत्रज्ञान. त्या चुलीची जागा स्टोव्हनं, नंतर गॅस सिलिंडरनं आणि पाहता पाहता मायक्रोव्हेवनं घेतली. अजूनही स्वयंपाकघराबाबत प्रयोग सुरू आहेत.

याचं कारण, अन्न ही गरज कधी संपणारी नाही आणि स्वाभाविकपणे ते तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा शोधही कधी संपणारा नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते विसाव्या शतकाच्या तब्बल आठ दशकांपर्यंत टाईपरायटर हा नावीन्यपूर्ण घटक होता. ते तंत्रज्ञान होतं. संदेशाची जशीच्या तशी प्रत निर्माण करणारं टेलिग्राम हे तंत्रज्ञान होतं.

माहिती तंत्रज्ञानाचं शतक

एकविसावं शतक माहिती तंत्रज्ञानाचं असेल हे भाकीत विसाव्या शतकाच्या शेवटच्या दीड दशकात वर्तवलं गेलं होतं. तोपर्यंत माहिती ही तंत्रज्ञानात रूपांतरित होण्याची प्रक्रिया गतिमान झाली होती. माहितीच्या वहनाचा वेग वाढला. माहितीचं स्वरूप बदलत गेलं. माहितीच्या उपयुक्ततेवर संशोधन होत राहिलं.

या साऱ्यांतून तंत्रज्ञानाचा विकास होत गेला. एकविसावं शतक माहिती तंत्रज्ञानाचं असेल असं म्हणणं आणि प्रत्यक्षात त्यादृष्टीनं संशोधन होणं, तंत्रज्ञानाचा विकास होणं या दोन गोष्टींमध्ये सुसूत्रता असणं आवश्यक होतं.

तंत्रज्ञान
Mumbai News : कपडे काढताना रिव्हॉल्वर खाली पडली आणि गोळी सुटून एकजण जखमी

ते घडून आल्यानं या शतकातल्या तिसऱ्या दशकात तंत्रज्ञानाची नवी क्षितिजं दिसत आहेत. या क्षितिजांमध्ये तीन शब्द परवलीचे बनले आहेत. बिग डेटा, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स.

या तीन शब्दांनी गेली तीन वर्षं व्यापून गेली आहेत. पुढचं दशकभर या तीन शब्दांचं तंत्रज्ञानावर राज्य राहील अशी परिस्थिती आहे. याचं कारण, अनेक क्षेत्रांतल्या गरजा भागवण्याची ताकद या तीन शब्दांच्या एकत्रित वापरात आहे.

युरोपचे ताजे प्रयत्न

औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या शतकावर आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तंत्रज्ञानावर युरोपचा प्रभाव होता. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत प्रभावाचा केंद्रबिंदू अमेरिकेकडे सरकला. आशियात भारतानं आणि चीननंही स्वतःचं प्रभावक्षेत्र निर्माण केलं. या साऱ्याचा परिणाम असावा म्हणून बिग डेटा, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांकडे युरोपीय महासंघ अत्यंत गांभीर्यानं पाहतो आहे.

तंत्रज्ञान
Mumbai News : पाकिस्तानी सीमाला परत द्या, अन्यथा मुंबईत घातपात; पोलिसांना अज्ञाताकडून धमकीचा कॉल

या तिन्हींच्या एकत्रीकरणाचे परिणाम शैक्षणिक परिघापुरते मर्यादित राहू नयेत, ते उद्योगांपर्यंत विकसित झाले पाहिजेत यासाठी युरोप कसोशीनं प्रयत्न करतो आहे. युरोपनं आधीच्या शतकांवर वर्चस्व गाजवलं याचं कारण तंत्रज्ञानाची उपयुक्तता हे होतं. तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळांपुरतं राहू नये, ते लोकांच्या उपयोगात आलं पाहिजे ही धारणा होती. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत युरोपच्या आधी अन्य देशांनी लोकांसाठीचा वापर सुरू केला होता. ती दिरंगाई येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासात राहू नये अशी योजना स्पष्टपणे समोर येते आहे.

तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर

पाणी, रसायनं, अभियांत्रिकी, स्टील, सिमेंट, खनिजं, सिरॅमिक्स, नॉनफेरस धातू, कागद आणि स्टील अशा स्वरूपाच्या उत्पादन -उद्योगांवर युरोपीय महासंघाचा भर आहे. या क्षेत्रात बिग डेटा, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कसं वापरता येईल यासाठीचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

उद्योगांमधली आव्हानं काय आहेत, गरजा काय आहेत यांचा अभ्यास करून त्या आव्हानांवर आणि गरजांसाठी बिग डेटा, ‘एआय’ वापरण्याचा युरोपचा प्रयत्न आहे. या साऱ्या प्रक्रिया उद्योगांच्या ‘बोर्ड रूम’मध्ये राहू नयेत, तर त्यांचा प्रत्यक्ष वापर व्हावा, यासाठी यंत्रणा उभी केली जात आहे. या यंत्रणेत माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातल्या भविष्याच्या शोधात असलेल्या कंपन्या, संशोधक, अभियंते आणि संस्थांची मदत घेतली जात आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांची कार्यक्षमता सुधारावी, उत्पादन वाढावं आणि अधिक किफायतशीरपणे ग्राहकांना उत्पादनसेवा पुरवता यावी अशी सारी रचना आहे. अंतिमतः जागतिक बाजारपेठांमध्ये युरोपचं स्थान बळकट व्हावं अशी अपेक्षा आहे. उदाहरणार्थ : सिमेंट-उद्योगातली प्रक्रिया ‘एआय’द्वारे नियंत्रित केल्यास यंत्रांची कार्यक्षमता सर्वाधिक वापरता येते आहे.

सिरॅमिक-उद्योगामध्ये बिग डेटा आणि मशिन लर्निंगचा वापर करून उत्पादन, विक्री, उत्पादनविकास आणि व्यवसायवृद्धी साधता येते आहे. पाण्यावर प्रक्रियेसाठी ‘एआय’चा प्रभावी वापर होतो आहे. जलस्रोतांची निगा राखण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करता येतो आहे. या गोष्टींमध्ये युरोपीय महासंघ पुढाकार घेतो आहे.

शिकण्यासाठीच्या गोष्टी...

औद्योगिक क्रांतीमधून उदयाला आलेल्या उद्योगांना आजच्या आणि उद्याच्या तंत्रज्ञानाची भक्कम साथ मिळाली तर उद्याचा उद्योग अधिक बळकटपणे उभा राहू शकतो. युरोपात ही जाणीव जरूर वाढते आहे. जगाच्या बदलत्या आर्थिक रचनेत युरोपचं घसरलेलं स्थान तिथल्या उद्योगांनाही पुरेसं माहीत झालं आहे.

तंत्रज्ञान
Mumbai : दारूसाठी पैसे दिले, बसायला खुर्ची ही दिली नाही; दारुड्याने सेक्युरिटी गार्डच्या डोक्यात घातला दगड

आहे हीच स्थिती राहिली तर युरोप भविष्यातल्या तंत्रज्ञानाच्या लाटेत मागं ढकलला जाऊ शकतो याचंही आकलन सरकारी पातळीवर होतं आहे. त्यातूनच तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापराचा आग्रह वाढतो आहे. त्यासाठी सरकार म्हणून उद्योगांसाठी पावलं उचलली जात आहेतच; शिवाय, संशोधनाची साथही मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत.

औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व केलेला युरोप ‘एआय’ क्रांतीचं नेतृत्व करू शकेल अथवा नाही, हे आज ठाऊक नाही. तथापि, ‘एआय’च्या व्यावहारिक वापराचा मोठा लाभार्थी बनण्यासाठीची ही पावलं आहेत, जी भारतीय उद्योगाला, शैक्षणिक क्षेत्रालाही विचारात घ्यावी लागणार आहेत.

samrat.phadnis@esakal.com

@PSamratSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com