चहा युद्ध

पावसातल्या वाफाळत्या मसाला चहा कपामागे लपलेली बुलबुली आणि जंगलाच्या सुवासाची ही आठवणींची गोष्ट, चहा आणि अनुभवांची एकत्रित गोड चव सांगते.
Masala Chai
Masala Chai Sakal
Updated on

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

नुकताच २१ मे ला, आपण जागतिक चहा दिवस साजरा केला. गेले काही दिवस पाऊसही भेटीला येतोय. पाऊस पडल्यावर लगेच सोशल मीडियावर गरम-गरम भजी आणि चहाचे वाफळते कप यांचे फोटो आणि रील्स पावसाच्या सरींपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त संख्येने कोसळू लागले! टपरीवरचा काचेचा ग्लास (एकात चहा आणि दुसरा ग्लास पहिल्याच्या खाली चटका न बसता नीट धरता यावं म्हणून), वाफा आणि त्यात तपकिरी - सोनेरी रंगाचा मध्यम गोड, सुगंधित मसाला चहा! आहाहा! नुसता फोटो पाहिला, तरी आपल्या मेंदूत साठवलेला त्याचा गंध आणि चव जाणवते! आलं, वेलची, तुळस, गवती चहा कुटून घातलेला व भरपूर उकळलेला मसाला चहा! या निमित्ताने वाटलं आज ही गोष्ट सांगायलाच हवी - मसाला चहाची गोष्ट!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com