Premium|Indian Cricket History : क्रिकेटच्या जगात भारताची वाढती ताकद; इंग्लंडच्या खेळाडूंची भारतात येण्यासाठी उत्सुकता

ICC headquarters shift to Dubai : क्रिकेट पत्रकारितेतील ४० वर्षांचा प्रवास मांडताना इंग्लंडमधील बदललेल्या सामाजिक आणि क्रिकेटमधील स्थितीवर भाष्य केले आहे. एकेकाळी भारतीयांकडे दुर्लक्ष करणारे इंग्रज आता भारतात कामासाठी रांगा लावून उभे असल्याचे चित्र लेखकाने स्पष्टपणे रेखाटले आहे.
Indian Cricket History

Indian Cricket History

esakal

Updated on

एकेकाळी भारताच्या दौऱ्यावर यायला काचकूच करणारे इंग्लंडचे आजी-माजी खेळाडू आता रांग लावून भारतात यायला एका पायावर तयार झालेले दिसतात. चार दशकांतील प्रवासात बरेच काही डोळ्यांसमोर उभे ठाकले... अशाच बदलेल्या चित्रातील काही मोजक्या गोष्टी मांडायचा हा प्रयत्न...

मी १९८३ मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना महाराष्ट्राच्या तरुण खेळाडूंच्या संघाला आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा म्हणून मिलिंद गुंजाळच्या नेतृत्वाखाली सामने खेळायला इंग्लंडला पाठवले गेले होते. त्या काळात मला माझा जवळचा मित्र प्रसाद प्रधानचा हेवा वाटायचा. कारण होते ते म्हणजे त्याचा सख्खा मामा मधू गुप्ते त्यावेळीच इंग्लंडला स्थायिक झाला होता. घरातील इतके जवळचे कोणीतरी इंग्लंडमध्ये असणे किती भाग्याचे लक्षण आहे, असे मला वाटायचे. तो काळ असा होता की कोणी परदेशात आहे किंवा शिकायला परदेशात गेले आहे, हे जास्त करून हिंदी सिनेमातच ऐकायला मिळायचे. हिंदी सिनेमातील हीरो असला तर तो ‘अमेरिका’हून शिकून आलेला असायचा आणि हिरॉइन असली तर ती ‘लंडन’हून परत येत असायची. कित्येक लोकांना हे ऐकून ऐकून ‘लंडन’ हा देश वाटायचा. लंडन इंग्लंडमधील एक शहर आहे, याचीसुद्धा पूर्ण कल्पना बऱ्याच लोकांना नसायची.

Indian Cricket History
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे मागील काही वर्षातील दर्जेदार १० सिनेमे; तुम्ही किती पाहिलेत?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com