उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व

आळस हा माणसाच्या शरीरातच राहणारा त्याचा मोठा शत्रू आहे
उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व
उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्वesakal

मंजिरी धामणकर manjiridhamankar@gmail.com

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः।

नास्ति उद्यमसमो बन्धुः कृत्वा यं न अवसीदति।।

अनुवाद : आळस हा मोठा शत्रू नरदेहामधेच वसत असे

उद्योगासम मित्रचि नाही, ऱ्हासाप्रत कधि नेत नसे

अर्थ : आळस हा माणसाच्या शरीरातच राहणारा त्याचा मोठा शत्रू आहे. आणि उद्योग, काम करणं यासारखा माणसाचा दुसरा मित्र नाही; कारण सतत उद्योगात असणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या माणसाचा कधी ऱ्हास, अधोगती होत नाही.

उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व
Nandurbar Agriculture News : बोरद परिसरातील शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल; बियाण्याऐवजी रोपलागवडीकडे वाढता कल

उद्योगिनं पुरुषसिंहं उपैति लक्ष्मीः।

दैवं हि दैवमिति कापुरुषाः वदन्ति।

दैवं निहत्य कुरु पौरुषं आत्मशक्त्या।

यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः।।

अनुवाद : लक्ष्मी जाते उद्योगी नरसिंहापाशी

भ्याड परी ठरवत बसतो दैवाला दोषी

आत्मबलाने मात करी रे दैवावरती

यत्नाने जरि नाही सिद्धी, ना तू दोषी

अर्थ : उद्योगी माणसाला सुभाषितकारानं नररूपी सिंहाची उपमा दिली आहे. अशा माणसाकडं लक्ष्मी स्वतःच चालून येते; पण आळशी, भ्याड माणसं मात्र काहीही न करता नुसती नशिबाला बोल लावत बसतात. सुभाषितकार सांगतो की, अरे...स्वतःच्या शक्तीच्या, कर्तृत्वाच्या जोरावर दैवावर मात करायचा प्रयत्न कर. मात्र, प्रयत्न करूनही जर तुला यश मिळालं नाही तरी तो दोष तुझा नाही. म्हणून माणसानं कधी प्रयत्न सोडू नयेत.

उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व
Nashik News : सीएसआर फंडातून जि. प. आरोग्याला 3 रुग्णवाहिका

विहाय पौरुषं यो हि दैवमेवावलंबत।

प्रासादसिंहवत् तस्य मूर्ध्नि तिष्ठन्ति वायसाः।।

अनुवाद : जो सोडुनि पुरुषार्थ नशीबावरती अवलंबुन असतो

सिंहमूर्तिसम शिरी तयाच्या वास कावळ्यांचा असतो

अर्थ : उद्योगी माणूस नररूपी सिंह असेल तर पुरुषार्थ म्हणजे काही उद्योग न करता, काम न करता दैवावर अवलंबून राहणारा निरुद्योगी, आळशी माणूस. म्हणजे, जणू एखाद्या महालाच्या आवारात असलेला सिंहाचा दगडी पुतळा, असं सुभाषितकार म्हणतो. त्या दगडी सिंहाची पत्रास न ठेवता त्याच्या डोक्यावर जसे कावळे बिनदिक्कत बसतात, त्याचप्रमाणे नशिबावर हवाला ठेवून बसलेल्या निरुद्योगी माणसाची गत होते.

उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व
Dhule Drought News : यंदा 1972 च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी; चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

योजनानां सहस्रं तु शनैर्गच्छेत् पिपीलिका।

अगच्छन् वैनतेयोऽपि पदमेकं न गच्छति।।

अनुवाद : मुंगी हळूहळू चालत हजार योजन अंतर जाउ शके

स्थिर बसलेला गरुड परंतू एकहि पाउल ना टाके

अर्थ : एवढीशी मुंगी हळूहळू; पण चिकाटीनं जात राहिली तर ती हजार योजनंसुद्धा जाऊ शकेल; पण बलशाली पक्षीराज गरुड जर आळसानं स्वस्थ बसला तर तो एक पाऊलही पुढं जाणार नाही. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक उत्साह, धैर्य आणि चिकाटी असेल तरच माणसाची प्रगती होऊ शकते. (योजन हे अंतर मापण्याचं पूर्वीचं एक परिमाण होतं. एक योजन = सुमारे १३ किलोमीटर.)

उद्यममहिमा अर्थात् उद्योगाचं महत्त्व
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथैः।

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः।।

अनुवाद : काम होतसे केल्याने रे, फक्त मनोरथ व्यर्थचि ते

झोपी गेलेल्या सिंहांच्या मुखी हरिण ना प्रवेशते

अर्थ : कोणतंही काम फक्त मनसुबे रचून पूर्ण होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष ते काम करावं लागतं. उदाहरणार्थ : झोपलेल्या सिंहांच्या तोंडात हरीण (किंवा कोणताही प्राणी) आपणहून जात नाही, त्यासाठी त्याला स्वतः शिकारच करावी लागते.

पश्य कर्मवशात् प्राप्तं भोजनकालेऽपि भोजनम्।

हस्तोद्यमं विना वक्त्रं प्रविशेन्न कथञ्चन।।

अनुवाद : ताट जरी आयते मिळाले नशिबाने भोजनकाळी

हाताने केल्याविण कार्य...तोंडी घास न जाय मुळी

अर्थ : सुभाषितकार म्हणतो, ‘असं बघ, एखाद्या (निरुद्योगी) माणसाला काम न करता जेवायच्या वेळी नशिबानं आयतं ताट जरी समोर आलं तरी त्याला त्याच्या हातानं घास उचलून तोंडात घालण्याचं काम करावंच लागतं. त्याशिवाय त्याच्या तोंडात आपोआप घास कधीही जात नाही.’

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com