Maratha Reservati: मायणीचे दहा हजार आंदोलक मुंबईकडे निघणार: डॉ. विकास देशमुख : मनोज जरांगे- पाटील यांना देणार पाठिंबा
Dr. Vikas Deshmukh Leads Mayani Agitation: डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘गेल्या पंधरा दिवसांपासून मायणी व परिसरातील गावागावांत मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणाच्या लढाईसंदर्भात घोंगडी बैठका होत आहेत. त्यात प्रत्येक गावातील आबालवृद्ध, महिला, शेतमजूर, कामगार, शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
Thousands of Maratha protesters from Mayani marching towards Mumbai to extend support to Manoj Jarange-Patil’s reservation agitation.Sakal
कलेढोण: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसणार असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मायणी व परिसरातील गावातून दहा हजार आंदोलक जाणार असल्याचे मायणी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख यांनी सांगितले.