
“Yashwant Bank, Phaltan under scanner after ₹112 crore scam involving 195 fake loan accounts — shockwaves across Satara district.”
Sakal
कऱ्हाड : फलटण येथील यशवंत बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण व एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ अशा लेखापरीक्षण पूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवला आहे. पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे.