

Short Circuit Turns 12 Acres of Standing Cane to Ashes; Koregaon Farmers in Shock
Sakal
कोरेगाव : तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे आज दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे १० ते १२ एकर ऊस जळाल्यामुळे उसासह ठिबक सिंचन साहित्य असे सुमारे दहा १० ते १२ लाखांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी सलग चौथ्या वर्षी उसाचे फड जळण्याचा प्रकार घडत असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.