सातारा जिल्ह्यात १३ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू; दिवसभरात ७८३ रुग्णांना कोरोनाची बाधा

सातारा जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेच्‍या अहवालानुसार आज जिल्‍ह्यात ७८३ जणांना कोरोनाची बाधा झाल्‍याचे समोर आले असून उपचारादरम्‍यान आज १३ बाधितांचा मृत्‍यु झाला.
Coronavirus
Coronavirussakal
Summary

सातारा जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेच्‍या अहवालानुसार आज जिल्‍ह्यात ७८३ जणांना कोरोनाची बाधा झाल्‍याचे समोर आले असून उपचारादरम्‍यान आज १३ बाधितांचा मृत्‍यु झाला.

सातारा - जिल्‍हा आरोग्‍य यंत्रणेच्‍या अहवालानुसार आज जिल्‍ह्यात ७८३ जणांना कोरोनाची (Coronavirus) बाधा झाल्‍याचे समोर आले असून उपचारादरम्‍यान (Treatment) आज १३ बाधितांचा मृत्‍यु (Death) झाला. बाधित रुग्ण सापडण्‍याचे सर्वाधिक प्रमाण सातारा आणि कऱ्हाड तालुक्‍यात असून तेथील बाधित संख्‍या नियंत्रणात आणणे आरोग्‍य यंत्रणेसाठी आव्‍हान ठरणार आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍ह्‍यात कोरोनाबाधित सापडण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली होती. बाधितांची संख्‍या दिड हजारांच्‍या पुढे जाण्‍यास सुरुवात झाल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासनाने त्‍यासाठीच्‍या उपाययोजना राबविण्‍यावर भर दिला. आरोग्‍य यंत्रणेने आज जाहीर केलेल्‍या अहवालानुसार सातारा तालुक्‍यात १९०, तर कऱ्हाड तालुक्‍यात १६२ बाधित सापडल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. जावळीत १७, खंडाळा- ४७, खटाव- ७१, कोरेगाव- ५८, माण- ३६, महाबळेश्‍‍वर- १४, पाटण- ३१, फलटण- ९३, वाई- ३७ आणि इतर ठिकाणी २७ बाधित सापडले आहेत. उपचारादरम्‍यान १३ जणांचा मृत्‍यु झाला. त्यामध्‍ये जावळी, खटाव, कोरेगाव, माण, पाटण येथील प्रत्‍येकी एकाचा, तर सातारा आणि कऱ्हाड येथील प्रत्‍येकी तिघांचा समावेश आहे. उपचारादरम्‍यान आज वाई येथेही दोन जण मृतू झाल्‍याची माहिती आरोग्‍य विभागाने अहवालाव्‍दारे दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com