
Good News : सातारा, कोरेगाव एमआयडीसीसाठी 15 कोटींचा निधी; अविनाश सुभेदारांची माहिती
बिजवडी (सातारा) : महाराष्ट्र विकास औद्योगिक कॉर्पोरेशन (Maharashtra Industrial Development Corporation) अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या (Fire Station) बांधकाम तसेच त्याअंतर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये, तर कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. (15 Crore Fund For Satara Fire Station From Maharashtra Industrial Development Corporation)
सुभेदार म्हणाले, "सातारा जिल्ह्यात अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती. तीच गरज ओळखून विभागाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र व कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. सातारच्या केंद्रासाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या केंद्रांतर्गत अग्निशमन वाहने, इमारत बांधकाम, कर्मचाऱ्यांसाठी घरे आदी सोयी-सुविधा राबवल्या जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
कोरेगाव येथील मिनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे याठिकाणच्या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे रस्त्याची दुरुस्ती होऊन चांगले रस्ते तयार होणार आहेत.'' सातारा व कोरेगाव एमआयडीसीच्या कामांचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (मास) अध्यक्ष उदय देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्याकडे देण्यात आले. या वेळी अनिल सुभेदार उपस्थित होते.
'जनकल्याण'ने जपली सामाजिक बांधिलकी; 'पंतप्रधान-मुख्यमंत्री साहाय्यता'ला दिला भरघोस निधी
15 Crore Fund For Satara Fire Station From Maharashtra Industrial Development Corporation
Web Title: 15 Crore Fund For Satara Fire Station From Maharashtra Industrial Development
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..