Satara Rain Update : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; जिल्ह्यात 17 टक्केच पाऊस, फक्त 30 टक्के पेरण्या पूर्ण

आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १७ टक्केच पाऊस झाल्याने सर्वजण मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Rainfall in Satara District
Rainfall in Satara Districtesakal
Summary

गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टीएमसी कमी पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांत पुरेसा पाणीसाठा होण्यास मदत होईल.

सातारा : आधीच उशिरा सुरू झालेल्या मॉन्सूनचा (Monsoon) जोर जुलैमध्ये कमी झाल्याने उगवण झालेल्या खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर पेरण्या आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रमुख धरणांत एकूण केवळ ३०.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १७ टक्केच पाऊस झाल्याने सर्वजण मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. जूनच्या शेवटी पावसाने सुरुवात केली आहे.

Rainfall in Satara District
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

सध्या ऐन जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या पाऊस थांबल्याने शेतकरी उर्वरित पेरणी करण्यास तयार नाहीत. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या पेरण्या सुरू आहेत; पण पावसाचा जोर कमी झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांत आहे.

Rainfall in Satara District
PM Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता एक रुपयात मिळवा पीक विमा; 'या' तारखेपर्यंत असणार मुदत

मागील काही दिवसांत पेरणी केलेल्या सोयाबीनची चांगली उगवण झाली आहे. पावसाचा जोरच कमी झाल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असला, तरी धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही.

सध्या कोयनेत १७.६५, धोम २.८४, धोम बलकवडी १.६७, कण्हेर १.९०, उरमोडीत ३.१३, तारळीत ३.११ टीएमसी पाणी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी मात्र प्रमुख धरणांमध्ये एकूण ४१.०४ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टीएमसी कमी पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांत पुरेसा पाणीसाठा होण्यास मदत होईल.

Rainfall in Satara District
Karnataka : शेतकऱ्याला शिव्या देत चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला; पाठलाग करून पळवला अडीच टन टोमॅटोचा ट्रक

गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाऊस

जिल्ह्याचा (जून ते सप्टेंबर) सरासरी पाऊस ८८६.२ मिलिमीटर इतका असतो. आतापर्यंत १५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तो केवळ १७ टक्के आहे. अद्याप ८३ टक्के पाऊस होणे बाकी आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात २२७.८ मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाऊस खूपच कमी आहे. जुलैमध्ये उर्वरित पावसाची सरासरी पूर्ण होण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com