
‘म्हसवड, : उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी म्हसवड येथील १४ शेतकऱ्यांची तब्बल १३९ हेक्टर शेतजमीन संपादित करून ती सर्व शेतकऱ्यांनी स्वखुशीने शासनास दिल्याचे फेरफारमध्ये भासविल्याने संबंधितांना शासन दरबारी तब्बल ३२ वर्षे पाठपुरावा करावा लागला. तरीही जमिनीच्या मोबदल्यापोटी मिळणारे सुमारे ८० कोटी रुपये अद्यापही अदा होऊ शकलेले नाहीत. फेरफारमधील ‘स्वखुशी’ या एका शब्दामुळे तत्कालीन शेतकऱ्यांनी ती जमीन विनामोबदला दिली असल्याची भूमिका शासन व संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर ‘खुदकुशी’ (आत्महत्या) करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.