'इन्स्पायर अवॉर्ड'मध्ये सातारा राज्यात तिसरा; पुणे प्रथम, नाशिक द्वितीय

सूचना दिल्या. नामनिर्देशनात येणाऱ्या विविध अडीअडचणी दूर केल्या.
Satara
SataraSakal

मायणी : इन्स्पायर अवॉर्ड (२०२१-२२) मानक योजनेच्या विद्यार्थी नामनिर्देशनात सातारा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला असून पुण्याने प्रथम व नाशिकने द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवली आहे.

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत इन्स्पायर अवार्ड मानक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अधिकाधिक पाच विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असते. नवनवीन विचार, संकल्पना, तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी उपकरणे बनविणे अपेक्षित असते. त्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये डिजिटली जमा करण्यात येतात. योजनेच्या पहिल्या टप्प्यात इन्स्पायर अवॉर्ड मानकाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांचे, त्यांना सुचलेल्या विचार, कल्पना, आयडियांचे (उपकरणे) नामनिर्देशन करावे लागते.

नुकतीच नामनिर्देशनाची मुदत संपली आहे. विहित वेळेत अधिकाधिक शाळा व विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन वाढविण्यासाठी योजनेचे राज्य समन्वयक रवींद्र रमतकर, राजू नेब तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या प्रियांका खोले यांनी वारंवार मार्गदर्शन केले. साताऱ्याच्या शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रभावती कोळेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी चोपडे यांनीही प्रोत्साहन दिले. त्यानुसार जिल्ह्याचे समन्वयक लक्ष्मण उबाळे, जिल्हा परिषदेच्या विज्ञान पर्यवेक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी मंगल मोरे यांनी साताऱ्याचे शंभर टक्के नामनिर्देशनाचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरवात केली. जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांची ऑनलाईन मिटिंग घेऊन, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे वारंवार पाठपुरावा केला. मार्गदर्शन केले. सूचना दिल्या. नामनिर्देशनात येणाऱ्या विविध अडीअडचणी दूर केल्या.

Satara
"नगरपालिका असूनही पालिकेचा विकास व विस्तार देखणा आणि लक्षणीय आहे"

त्या कामात प्रमोद रांजणे, घोडके मॅडम, संदीप त्रिंबके, विष्णू ढेबे, सचिन पंडित यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे नोंदणीत वाढ झाली. आणि सर्वाधिक पहिल्या तीन नामांकनात सातारा जिल्ह्याने बाजी मारली. पुणे जिल्ह्यातील ७३१ शाळांतून २६८३, नाशकातील ६८० शाळांमधून २३३९ , साताऱ्यातील ६३० शाळांतून २१७०, अकोल्यातील ५२५ शाळांतून १५८० तर भंडारा जिल्ह्यातील ४३९ शाळांतून १५३८ उपकरणांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. असे राज्यस्तरावर १०७७० शाळांनी सहभाग घेतला असून ३२२४६ उपकरणांची नाव नोंदणी झाल्याची माहिती जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी सर्वांच्या सामुदायिक परिश्रमामुळे सातारा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला. जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे.- मंगल मोरे ( विज्ञान पर्यवेक्षिका, जिल्हा परिषद सातारा)

Satara
मुंबई : नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे ; मंगल प्रभात लोढा

सातारा जिल्ह्याचे काम उत्तम आहे. जिल्हा समन्वयक उबाळे सर आणि विज्ञान पर्यवेक्षिका मोरे यांनी तर परजिल्ह्यातील टार्गेट पूर्ण करण्यासाठीही योगदान दिले. - रवींद्र रमतकर (राज्य समन्वयक,इंस्पायर अवॉर्ड )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com