
-राजेंद्र ननावरे
मलकापूर: येथील राजीव रावसाहेब घार्गे या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने ‘माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प’पर्यंतचे हिमशिखर १२ दिवसांत यशस्वी सर केले. १८ हजार फूट उंच खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर मराठी झेंडा फडकावत ही मोहीम यशस्वी केली. यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा ही मोहीम यशस्वी केली होती. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.