खटावातील ब्रिटिशकालीन शाळांना 70 लाखांचा निधी

Zilla Parishad School
Zilla Parishad Schoolesakal

विसापूर (सातारा) : खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) व जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सदस्या सुनीता कचरे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून खटाव व पुसेगाव जिल्हा परिषद गटांतील सात नवीन शाळा (Zilla Parishad School) खोल्यांकरिता ६२ लाख ७२ हजार व शाळा दुरुस्तीसाठी साडेसात लाख असे एकूण ७० लाख २२ हजार निधी मंजूर झाल्याची माहिती खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे (Santosh Salunkhe) यांनी दिली.

Summary

तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारती ब्रिटिशकालीन व स्वातंत्र्य काळातील आहेत.

तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारती ब्रिटिशकालीन व स्वातंत्र्य काळातील आहेत. या इमारतींची दुरवस्था झाल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसणे धोकादायक झाले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेल्या गावांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता जिल्हा नियोजन समितीतून नवीन शाळा खोल्या मंजूर करण्याची मागणी खटाव व पुसेगाव गटातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती.

Zilla Parishad School
'आरक्षणाचा मुद्दा न सोडविल्यास ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल'

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सदस्या सुनीता कचरे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून खटाव जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर, कटगुण, जांब, दरजाई, तर पुसेगाव जिल्हा परिषद गटातील बुध येथे प्रत्येकी एक व चिंचणी शाळेसाठी दोन खोल्या मंजूर झाल्या आहेत. प्रत्येकी एका शाळा खोलीसाठी आठ लाख ९६ हजार निधी असे सात शाळा खोल्यांकरिता ६२ लाख ७२ हजार निधी मंजूर झाला आहे. शाळा दुरुस्तीसाठी आवारवाडी शाळेसाठी दोन लाख ५० हजार, जाखणगाव शाळा दुरुस्ती तीन लाख व मोळ शाळा दुरुस्तीकरिता दोन लाख असे एकूण सात लाख ५० हजार निधी मंजूर केला आहे. श्री. साळुंखे म्हणाले,‘‘ शासनाचा निधी व लोकचळवळीच्या माध्यमातून शंभर टक्के शाळा डिजिटल व भौतिक सुविधांयुक्त निर्माण झालेल्या आहेत. तालुक्यामध्ये शिक्षण विभाग मायक्रो प्लॅनिंग करून गुणवत्तावाढीसाठी काम करत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये घवघवीत यश संपादित करीत आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com