esakal | satara : रक्त नमुने घ्या! जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडमध्ये बैठक

रक्त नमुने घ्या! जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांची सूचना

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): शहर व तालुक्यात डेंगी, चिकुनगुनियासह किटकजन्य आजारांचे फैलाव पारेषण कालावधी आहे. त्यामुळे दर हजारी दहा जणांचे रक्त नमुने घेऊन तपासणी करा. किटकशास्त्रीय सर्वेक्षण प्रभावीपणे करावे. त्यासाठी ग्रामपंचायत, पालिकेची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी केले.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेची तोकडी शिल्लक, कोटीत देणी!

कऱ्हाड शहर आणि तालुक्यातील डेंगी, चिकुनगुनिया हिवतापासह इतर किटकजन्य आजारांचे फैलाव रोखण्यासाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांची बैठक वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

हेही वाचा: कऱ्हाड : राज्यावरील सर्व संकट दूर कर; खासदार पाटलांचे खंडोबाला साकडे

आरोग्य विस्तार अधिकारी कोळी, आरोग्य पर्यवेक्षक महेश पिसाळ उपस्थित होते. जंगम म्हणाल्या, ‘‘सध्या साथ उद्रेक व पारेषण कालावधी असल्याने दर हजारी दहा जणांचे रक्त नमुने घेणे आवश्यक आहे. किटकशास्त्रीय सर्वेक्षण प्रभावी होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. ग्रामपंचायत, पालिका यांचे मार्फत जनजागरण केले तर अजूनही चांगले काम होईल.’’ दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात मलेरिया विभाग स्थापन करावा, असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री. लादे यांनी जिल्हा हिवताप अधिकारी यांना दिले. महेश पिसाळ यांनी आभार मानले.

loading image
go to top