karad
karadsakal

कराड पालिका प्रशासनाकडून बिल्डर लॉबीला अभय?

पार्किंगच्या जागेत उभारले गाळे; ड्रेनेजसाठी धोकादायक
Summary

पार्किंगच्या जागेत उभारले गाळे; ड्रेनेजसाठी धोकादायक

कऱ्हाड : शहरात पार्किंगसाठी (city parking )म्हणून सोडलेल्या जागेत तयार झालेले गाळे व नव्या इमारतींतही होणारे गाळे शहराच्या ड्रेनेज योजनेला धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने धोक्याची घंटा वाजवली असूनही सहा महिने झाले तरीही कारवाई झालेली नाही. पालिका प्रशासन कारवाईचा केवळ इशाराच देऊन बिल्डर लॉबीला (builder loby) अभय देत आहे.

karad
सातारा : ‘सिव्‍हिल’मध्ये पगाराची परवड

शहरातील अपार्टमेंटसह गोळेधारकांवर कारवाईची गरज असतानाही राजकीय दबावापोटी (political pressure)काहीच कारवाई होताना दिसत नाही. परिणामी बिल्डर लॉबीला पाठीशी घातले जात असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे बेसमेंटचे गाळे थेट ड्रेनजला व्यवस्थेलाचा बाधक ठरत आहे. शहरात निम्म्यापेक्षाही जास्त इमारतींतील पार्किंगच्या जागा गाळ्यांनी व्यापली आहे. तेच गाळे आता अडचणीचे ठरताहेत. मध्यंतरी मुसळधार पावसाने बेसमेंटचे गाळे पहिल्याच पावसात पूर्ण भरून वाहिले. त्या गाळ्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी संबंधित मालकांनी थेट मोटारी लावल्या. ते पाणी ड्रेनजमध्ये सोडले. परिणामी, शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ड्रेनेज लाइनच विस्कळित होऊन ती तुंबू लागली आहे. सुरळीत सुरू असलेली ड्रेनेज व्यवस्था ढासळण्याचा मार्गावर आली होती. ड्रेनेज व्यवस्थेची मांडणीच बेसमेंटच्या गाळ्याने धोक्यात आली आहे. गाळ्यातील पाण्याचा साठा थेट ड्रेनेज व्यवस्थाच चोकअप करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com