
कऱ्हाड: राज्यात शेतकरी, कष्टकऱ्यांना सौरऊर्जा घेतल्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊनही शेतकऱ्यांना हक्काची वीज दिली जात नाही. त्याला अदानी यांचे सौरऊर्जा प्रकल्प जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याचे जबाबदारी घेतली आहे. अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक पंजाबराव पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.