“Relief after years of struggle – Dam-affected grandmother from Marathwadi finally receives pending compensation.”
Sakal
सातारा
Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही
Relief for Marathwadi Family: मराठवाडी येथील सुभद्रा शिंदे-मराठे याही त्यासाठी पात्र खातेदार असल्याने त्यांना रक्कम मंजूर झाली. मात्र, काही नातेवाइकांनी ही रक्कम त्यांना मिळू नये, यासाठी पाटणच्या प्रांताधिकारी कार्यालयात तक्रार केली.
ढेबेवाडी : शासनाकडून देय असलेली रक्कम सात वर्षांपासून अडवून ठेवून पुनर्वसनाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याने बिकट परिस्थितीशी तोंड देत असलेल्या आणि धरणस्थळी उपोषण करत इच्छा मरणाची परवानगी मागणाऱ्या मराठवाडी (ता. पाटण) येथील सुभद्रा सहदेव शिंदे- मराठे (वय ८०) यांना अखेर न्याय मिळाला. पाटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी शिंदे-मराठे यांना देय रक्कम वाटप करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही केल्याने जनजागर प्रतिष्ठानचा आणखी एक लढा यशस्वी झाला.