
Shivendrasinhraje Bhosale announces Ajinkytara scheme: ₹100 daily for farmers and 19% bonus for workers this Diwali.”
Sakal
काशीळ : अजिंक्यतारा साखर कारखान्याने गेल्या हंगामात उसाला ३२०० रुपये प्रतिटन दिले असून, या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. कामगारांना १९ टक्के बोनस देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. आगामी गळीत हंगामात आपला सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्याला घालून आपले सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.