Ajit Pawar: 'मी लेचापेचा नाही..', अजितदादांनी अखेर दिलं राजकीय आजाराच्या आरोपावर स्पष्टीकरण

त्यानंतर अजित पवार यांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात चर्चेत आला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्याची माहिती समोर आली. त्यांनी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री प्रफुल पटेल यांनी दिली होती. त्यानंतर अजित पवार यांना राजकीय आजार तर झाला नाही ना अशी चर्चां राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अजित पवारांच्या आजारपणावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. राजकीय वर्तुळातील या संपुर्ण चर्चांवर अजित पवारांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे.

कराडमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, 'दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झाला होता. त्या आजारामध्ये माझे १५ दिवस गेले. दुर्दैवाने त्यावेळेस मी टिव्ही पहायचो, पेपर वाचायचो, त्यावेळी राजकीय आजार अशा बातम्या पाहिल्या. मी काही असला लेचापेचा माणूस नाही, जी माझी मतं असतात ती, मी गेली ३२ वर्षींपासून स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असतो. राजकीय आजार अशी गोष्टी माझ्या रक्तात आणि स्वभावात नाही.'

Ajit Pawar
Ajit Pawar : महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये; असं कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

'कारण नसताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. काही दिवसांपुर्वी मी अमित शहा यांनी भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पण मी तक्रार करायला गेलो, अशा बातम्या आल्या. तक्रार करणं माझ्या रक्तातच नाही, शेवटी काम करत असताना सर्वांना सोबत काम करायचं असतं, तसी आपली परंपरा आहे, ती आपण चालवली पाहिजे', असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द, कारणही आलं समोर...

महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये- अजित पवार

अलीकडे वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे, त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, अलीकडं कोणी काही बोलतो. आरेला कारे केले जाते. ही शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, संस्कृती नाही. हे सर्वांनीच ध्यानात घेतलं पाहिजं, असा टोला सर्वच राजकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये बोलताना लगावला.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Yashwantrao Chavan Death Anniversary) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Ajit Pawar
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दौऱ्यात अडथळा; 'बळीराजा' अडवणार एकनाथ शिंदेंची वाट, काय आहे प्रकरण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com