Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दौऱ्यात अडथळा; 'बळीराजा' अडवणार एकनाथ शिंदेंची वाट, काय आहे प्रकरण?

यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कऱ्हाड दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Summary

'जर आम्हाला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला तर संघटनेतर्फे काळे झेंडे दाखवून गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल.'

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी त्यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. त्याचबरोबर त्यांच्याकडून दरवर्षी कऱ्हाड बाजार समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचेही उद्घाटन होते.

Eknath Shinde
पुणे-बंगळूर महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर थांबा! सरकारला इशारा देत शेट्टींचं आज महामार्गावर 'चक्का जाम'

त्यासाठी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कऱ्हाड दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यात बळीराजा शेतकरी संघटना (Baliraja Shetkari Sanghatana) त्यांना काळे झेंडे दाखवून ऊसदर जाहीर करा, मगच कृषी प्रदर्शनाला जावा असा इशारा देणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेकडून देण्यात आली.

Eknath Shinde
PM मोदींच्या वाढदिनी राज्यातील 73 ऐतिहासिक तीर्थस्थळांचा होणार कायापालट; पांडवकालीन कर्णेश्वर मंदिराचाही समावेश

बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, ऊसदर जाहीर करुन साखर कारखाने सुरु करावे असे साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांना कळवले आहे. मात्र, अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही. ही शेतकऱ्यांची लूटच आहे. मुख्यमंत्री शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनास येणार आहेत.

Eknath Shinde
कोयना धरणातून पाणी सोडण्यास शंभूराज देसाईंची आडकाठी; ताकारी योजना बंद करण्याची वेळ, कृष्णेचं पात्रही पडणार कोरडं?

कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी आहे. त्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी उसाचा दर जाहीर करावा आणि मगच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी जावे. त्याचबरोबर या प्रदर्शनाला खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींनीही जावू नये, अशी बळीराजा शेतकरी संघटनेची भूमिका आहे. जर आम्हाला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला तर संघटनेतर्फे काळे झेंडे दाखवून गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com