आता गावागावांतील रस्ते 'उजळणार'

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाइट जोडण्यासाठी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले व सहकाऱ्यांनी अनेकदा मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदने दिली. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी बैठक घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी बैठक घेऊन स्ट्रीट लाइट (Street light) सुरू करण्यासंदर्भातील आदेश दिले आहे. त्यामुळे गावोगावचे रस्ते उजळणार असल्याची माहिती सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली. (Ajit Pawar Orders Government To Provide Street Lights To Gram Panchayat bam92)

Summary

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी बैठक घेऊन स्ट्रीट लाइट सुरू करण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

पत्रकातील माहिती अशी : स्ट्रीट लाइटसंदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांचे याकामी त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांचे मार्गदर्शन घेऊन तसे त्यांनी लेखी पत्र ऊर्जा मंत्री यांना देऊन फोनवरून संपर्क केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भेटून मार्ग काढणेसाठी विनंती केली. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री यांना पदाधिकारी यांनी भेटून मागणी केली. त्यानंतर मंत्री सतेज पाटील, जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठक घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती.

Ajit Pawar
'शर्यत' बंदीमुळे आठ वर्षात 42 लाख बैलांची कत्तल

त्यानुसार आज त्यासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती दाखवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्ट्रीट लाइट सुरू करण्याचे आदेश दिले आहे. याकामी ज्ञानेश्वर वायाळ, मंदाकिनी सावंत, शंकरराव खापे, कोहिनूर सय्यद, भाऊसाहेब भराटे, सुजित हंगरेकर, अमरनाथ गिते, सुशील तौर, भद्रिनाथ चिंदे, संदीप देशमुख, प्रदीप झांबरे आदींनी परिश्रम घेतले.

Ajit Pawar
लस घ्यायला निघालात? सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जा!

कंदील घेऊन लाइट लागत नाही

स्ट्रीट लाइटचा सकारात्मक निर्णय झाला आहे. मात्र, कोणीतरी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे. कंदील घेऊन लाइट लागत नसते, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो. आंदोलन सरपंच यांनी करायचे नसून सरकार बरोबर राहून काम करायचे असते. निर्णय झाल्यावर मागणीचे निवेदन देणे म्हणजे वराती मागून घोडे असा प्रसिद्धीसाठीचा केविलवाणा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. दुसऱ्याच्या कष्टाचे फुकटचे श्रेय घेणे काही लोकांना शोभत नाही, अशी टिप्पणीही सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Ajit Pawar Orders Government To Provide Street Lights To Gram Panchayat bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com