esakal | ‘कोरोनामुक्त तालुका’ उपक्रमात सहभागी व्हा: राजेंद्र तांबे
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोरोनामुक्त तालुका’ उपक्रमात सहभागी व्हा: राजेंद्र तांबे

तालुक्यातील जनतेसाठी कोरोना लसीकरण मोहीम हातात घ्यावी, असे आवाहन पंचायत सभापती राजेंद्र तांबे यांनी केले आहे.

‘कोरोनामुक्त तालुका’ उपक्रमात सहभागी व्हा: राजेंद्र तांबे

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (सातारा): केसुर्डी (ता. खंडाळा) येथील केएसबी पंप या कंपनीने गावासाठी लसीकरणाबरोबर मोफत रुग्णवाहिका देऊन सर्व कंपन्यांपुढे आदर्श ठेवला आहे. औद्योगिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या तालुक्यातील कंपन्यांनी एकत्र येऊन ‘कोरोनामुक्त तालुका’ या उपक्रमास हातभार लावावा, तालुक्यातील जनतेसाठी कोरोना लसीकरण मोहीम हातात घ्यावी, असे आवाहन पंचायत सभापती राजेंद्र तांबे यांनी केले आहे.

हेही वाचा: गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

केएसबी केअर ट्रस्टच्या ग्रामदत्तक संकल्पनेतून लसीकरण शिबीर आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, शिरवळ पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश पाटील, केएसबी पंप कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) विजय यादव, प्लांट प्रमुख (केसुर्डी) मनीषसिंग दीक्षित, मॅनेजर (एचआर) सुहास डोईफोडे, प्रज्योत देशपांडे, दिनेश दिघे, तन्मय मोरे, सरपंच गणेश ढमाळ, मच्छिंद्र ढमाळ, नवनाथ ढमाळ उपस्थित होते. केसुर्डीसाठी केएसबी कंपनीने ६० लाख खर्चाची नळ पाणीपुरवठा, १४ लाखांचे लसीकरण व १२ लाखांची रुग्णवाहिका अशी ८६ लाखांची विकासकामे केली आहेत, असे सरपंच गणेश ढमाळ यांनी नमूद केले.

हेही वाचा: "गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा"

यावेळी सुहास डोईफोडे यांनी केएसबी केअर ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या वेळी बेल एअर हॉस्पिटलच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. बाबा लिमण यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top