esakal | "गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा"
sakal

बोलून बातमी शोधा

"गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा"

शीतल जानवे-खराडे म्हणाल्या, आपल्या सणांचे महत्त्व प्रशासन समजू शकते. या सणांवर बंधन घालायला प्रशासनाला आनंद नक्कीच होत नाही, मात्र कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. आपल्या सर्वांना हतबल केले आहे.

"गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा"

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा): गणेशोत्सव हा आपला सर्वांचा आनंदाचा, श्रद्धेचा, भक्तीचा सण असून गेल्या वर्षी प्रमाणेच काळजी घेऊन, गर्दी न करता कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून खबरदारी म्हणून इतर मंडळाशी ईर्षा, चढाओढ न करता या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे यांनी केले.

हेही वाचा: गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

जावली तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना जानवे बोलत होत्या. यावेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, सपोनि अमोल माने, जेष्ठ पत्रकार व नगरसेवक शशिकांत गुरव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

शीतल जानवे-खराडे म्हणाल्या, आपल्या सणांचे महत्त्व प्रशासन समजू शकते. या सणांवर बंधन घालायला प्रशासनाला आनंद नक्कीच होत नाही, मात्र कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. आपल्या सर्वांना हतबल केले आहे. ज्याने कोरोनाची दाहकता अनुभवलीय त्यालाच कोरोना काय आहे हे पक्क समजलं आहे, म्हणून हा कोरोना आटोक्यात राहण्यासाठी सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना आपल्या घरातून अथवा आपल्या मंडळातून कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

हेही वाचा: केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; पसरणी घाट रस्ता आज बंद

यावर्षी नवीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाणार नाही. तसेच जुन्या मंडळांनी परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा प्रतिस्थापणा व विसर्जन मिरवणुका काढू नयेत, बाप्पाची घरगुती मूर्ती दोन फूट व मंडळांची मूर्ती चार फुटच असावी, आरती, पूजा, कार्यक्रम करताना गर्दी करू नये, शक्यतो मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, बाप्पाचा प्रसाद बंद पाकिटातून द्यावा, गणेश मूर्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत व रात्री सुरक्षेसाठी मंडपात कार्यकर्ते ठेवावेत, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरजूंना मदत यासारखे उपक्रम राबवावेत, आपले मंडळ किंवा घर गणेशोत्सवातील गर्दी मुळे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन शीतल जानवे-खराडे यांनी केले.

हेही वाचा: केळघर घाटातील फेसाळणा-या धबधब्यांची लुटा मजा

तहसीलदार राजेंद्र पोळ म्हणाले, जावलीतील नागरिक स्वयंशिस्त पाळणारे आहेत. आपल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला नाही पाहिजे, याची काळजी सर्वांनी घ्यावी. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतरच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, आता तर कोरोनाचा खतरनाक डेल्टा व्हेरीयंट आला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे म्हणून सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा. पोलिसांना कोणावरही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता घ्यावी. यावेळी सपोनि अमोल माने व पत्रकार शशिकांत गुरव यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील सुहास भोसले यांनी आभार मानले.

loading image
go to top