esakal | शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूरचा भद्रोत्सव यंदाही रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

अंगापूरचा भद्रोत्सव

शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूरचा भद्रोत्सव यंदाही रद्द

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

अंगापूर (सातारा) : शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूर (ता. सातारा) येथील पारंपरिक श्री आत्म गजाननाचा भद्रोत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ धार्मिक विधी या काळात करून उत्सव होणार असल्याचे पोलिस प्रशासन व ग्रामस्थांनी सांगितले आहे.

हेही वाचा: होमआयसोलेशन ठरणार कोरोनावाढीला निमंत्रण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, शेकडो वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षीही खंडित होणार आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने मंदिरे, तसेच उत्सव, यात्रांना बंदी घातली असून, सर्वत्र १४४ कलम लागू करण्यात आले आहे. याच कालावधीत भद्रोत्सव गणेशोत्सव काळात होत आहे. या अनुषंगाने सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरीक्षक श्रीकांत देव, अंगापूर वंदनच्या सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, अंगापूर तर्फच्या सरपंच मनीषा शेडगे, उपसरपंच विशाखा शेडगे दोन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य, पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: चांगल्या पिढ्या घडवण्यात अंगणवाड्यांचं मोठं योगदान

या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार याही वर्षीचा भद्रोत्सव साध्या पद्धतीने व मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हंकारे यांनी केले. त्यास ग्रामप्रशासन व ग्रामस्थांनी प्रतिसाद देत धार्मिक विधी वगळता सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार (ता. १०) व शनिवार (ता. ११) हे उत्सवाचे मुख्य दिवस असून, या दोन्ही दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या कोरोना प्रतिबंधित नियमांनुसार मोजक्या मुख्य मानकऱ्यांच्या उपस्थितीत नियमित पूजाअर्चा, अभिषेकसह गणेश चतुर्थीला जन्मसोहळा होणार आहे. उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये. नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतीने केले आहे.

loading image
go to top