esakal | अरं काेण म्हणतं फुकट हाय; 200 रुपये जातायत लशीसाठी

बोलून बातमी शोधा

Covid 19 Vaccine
अरं बाबा, काेण म्हणतं फुकट हाय; 200 रुपये जात्यात लशीसाठी
sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : सातारा तालुक्‍यातील कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कास पठार परिसरातील गावांकडे कण्हेर आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुर्गम असलेल्या या गावांतील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहत आहेत.

कण्हेर हे गाव सातारा-मेढा रस्त्यावर आहे. कास परिसरातील या केंद्रांतर्गत येणारी गावे डोंगरावर आहेत. प्राथमिक केंद्रावर जायचे म्हटले तर साताऱ्याला जायचे व तेथून मेढा गाडीने कण्हेरला असा उलटा प्रवास करावा लागतो. याबाबत समस्या सांगताना कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले, ""कास पठार परिसरातील जवळजवळ 20 ते 25 गावे ही सातारा तालुक्‍याच्या हद्दीत येतात. त्यातील काही गावे परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत, तर काही कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येतात. कोरोना महामारीला थोविण्यासाठी संपूर्ण देशभर लसीकरण मोहीम सुरू आहे. कास पठार परिसरातील जावळी तालुक्‍याचे हद्दीत येणाऱ्या सर्व गावांत 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण मोहीम आखून योग्य नियोजन करून लसीकरण करण्यात आले.

Corona Virus : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर; वाईत कडक Lockdown

याच परिसरात राहणाऱ्या सातारा तालुक्‍यातील कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांतील 45 वयावरील लोकांना अजूनही लस मिळू शकली नाही. कास पठार कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले परिसरातील बामणोली, कुसुंबी, परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वाडी-वस्त्यांवर लसीकरण होते, मग कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये लसीकरण का होऊ शकत नाही? या बाबीकडे संबंधितांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील 45 व त्यावरील वयाच्या लोकांना लस देण्याचे नियोजन करावे, अशी आमची मागणी आहे.

कास भागातील ग्रामस्थांना लस घ्यायची झाल्यास त्यातील काही जणांना परळी तर काही जणांना कण्हेर येथे जावे लागते. त्यासाठी ग्रामस्थांना सुमारे 150 ते 200 रुपये येताे. याबराेबरच वाहनांची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरात शंभर टक्के लसीकरण हाेईल का नाही याची शंका आहे. या भागातील महिला लसीसाठी दाेनशे रुपयांचा खर्च कसा आम्हांला परवडेल असेही म्हणत आहेत. त्यामुळे यापुर्वी लावलेल्या लसीकरणाचा कॅम्प पुन्हा व्हावा अशी मागणी हाेत आहे.

कर्ज काढून पाहिलेलं स्वप्न डोळ्यांदेखत पुसलं; शेतकऱ्यांवर फुले तोडून फेकण्याची वेळ

स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ