

BJP Dominates Wai Municipal Council, Key Opponents Defeated
sakal
-भद्रेश भाटे
वाई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या थेट नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल सावंत २१५९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांना १२ हजार २८१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन कदम यांना १० हजार १२२ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदासह दहा सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ व एक बिनविरोध असे १२, तर एक अपक्ष सदस्य निवडून आले. नगराध्यक्षपद आपल्या ताब्यात घेण्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांचे स्वप्न मात्र पुन्हा भंगले आहे.