
Satara police arrest accused in army recruitment scam after duping youths with false job promises.
Sakal
सातारा: सैन्यात भरती करून देतो, असे सांगून इच्छुक युवकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप विठ्ठल काळे (वय २८, रा. कोळे, ता. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो आर्मीमध्ये जीएनआर गनर या पदावर असल्याचे तसेच दोन महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असल्याचे तपासात समोर आले आहे.