esakal | ऊस संशोधकाची मनाला चटका लावणारी एक्झिट

बोलून बातमी शोधा

Ashok Nikam
ऊस संशोधकाची मनाला चटका लावणारी एक्झिट
sakal_logo
By
अमाेल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेरे येथील डॉ. अशोक अधिकराव निकम (वय 55) यांचे कोरोना संक्रमण स्थितीत पुणे येथे नुकतेच निधन झाले. ते मांजरी (पुणे) येथील व्हिएसआय या आंतरराष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांची अचानकपणे झालेली एक्झिट गावकऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

गेली 26 वर्षे ते व्हिएसआयमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. आपल्याकडील ऊस विषयक ज्ञान गाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना कसे उपयोगी ठरेल, याकरिता त्यांची धडपड असायची. ऊती संवर्धित ऊस रोप निर्मितीमध्ये त्यांचे विशेष योगदान होते. नवीन ऊस जातींचा तितकाच त्यांना सखोल अभ्यास होता. यामुळे त्यांचा राज्यातील सहकारी साखर कारखानदारीशी जवळचा संबंध होता. अनेक कारखान्यांचे ते समनवयक होते. आपल्या सेवा कालावधीत ऊस संशोधन व शेतकऱ्यांना शुद्ध, किफायतशीर बेणे उपलब्धीसाठी त्यांचा सतत प्रयास राहिला.

'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

ऊस उत्पादन वाढ व विकास योजना प्रभावी ठरण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या आयोजनात ते अग्रेसर असायचे. संजीवनी शिक्षण संस्थेचे संस्थापक व पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव परसू निकम यांचे ते पुतणे होत. निकम कुटुंबातील डॉ. निकम हे अतिशय हुशार सदस्य होते. एमएस्सी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात सेवा केली. त्यानंतर ते गेली 26 वर्षे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होते. नोकरी करत त्यांनी पीएचडी व एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सतत शेतकऱ्यांबद्धल प्रामाणिक आस्था जपली. तसेच निकम कुटुंबातील शांत व अभ्यासू तारा निखळला आहे.

रेमडेसिव्हिर वाटपाचा ठरला Formula