Karad News : कऱ्हाड तालुक्यातील बाबरमाची ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा, काय आहे कारण ?

कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत.
Babarmachi Villagers
Babarmachi VillagersSakal

कऱ्हाड - कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत. ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आला आहे.

अशा बिलओवर कारवाई करावी, त्यांनी परस्पर कमी केलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावी. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर सामुहीक बहिष्कार घालु असा इशारा बाबरमाची ग्रामस्थांनी दिला. त्याबाबतचे निवेदन मतदार नोंदणी अधिकारी तथा कऱ्हाडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले.

निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, अधिक पाटील, संपतराव पाटील, भास्कर पाटील, अनिल पोळ, माणसिंग मुळीक, प्रविण जाधव, शंकर खोचरे, सचिन कदम, सुरेश खोचरे, राजाराम जगताप, प्रकाश बजुगडे, शुभम माने, अक्षय पाटील, विशाल कुंभार, अजय घोरपडे, रणजीत पाटील, अमोल पाटील, मुकुंद वाघमारे, राजेंद्र वाघमारे, गजानन घोरपडे आदी उपस्थित होते.

निवेदनातील माहिती अशी - १८ वर्षे पुर्ण झालेल्या प्रत्येक युवा व नागरीकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी मोठयाप्रमाणात जनजागृती व शिबिरे आयोजीत करण्यात येत आहेत. असे असताना बाबरमाचीतील बिएलओ राजकीय हेतूने काम करत आहेत. गावातील ठरावीक मतदारांची नावे त्यांनी परस्पर कमी करण्यात आली आहेत.

१८ वर्षे पुर्ण झालेल्या नविन मतदार नोंदणीसाठी दिलेली कागदपत्रे गहाळ करूण त्यांची नावे जाणीवपुर्वक मतदार यादीत येऊ दिली नाहीत. त्यामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा राजकीय हेतूने काम करणाऱ्या बिएलओवर कडक कारवाई करावी.

परस्पर वगळलेली नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावी अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर सामुहीक बहिष्कार टाकण्याचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. त्यावर बाबरमाचीतील मतदार यादीतुन वगळलेल्या नावांची चौकशी करून दोषीवर कारवाईचे अश्वासन प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com