कराड सोसायटीतील संघर्ष टाळण्यासंदर्भात जाहीर सभेतून बोलेन : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कराड सोसायटीतील संघर्ष टाळण्यासंदर्भात जाहीर सभेतून बोलेन : पाटील

जिल्हा बँकेतील कऱ्हाड सोसाटीतील संघर्ष टाळण्यासंदर्भातील जाहीर सभेतून बोलेन.

कराड सोसायटीतील संघर्ष टाळण्यासंदर्भात जाहीर सभेतून बोलेन : पाटील

कऱ्हाड (सातारा) : जिल्हा बँकेतील कऱ्हाड सोसाटीतील संघर्ष टाळण्यासंदर्भातील जाहीर सभेतून बोलेन. मात्र प्रत्येक निवडणुकीत संदर्भ बदलत जातात, त्यामध्ये प्रक्रीया असते. सहकारातील निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन लढावी लागते. त्या पद्धतीने आम्ही लढलो, अशी प्रतिक्रीया सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा: विधातेंच्या गोटात ना जल्लोष, ना विजयी मिरवणूक

मंत्री पाटील यांची विजयानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूर नाक्यावर मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. तेथून वाहनातून निघालेली रॅली थेट ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पोहोचली. वाटेत महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही त्यांनी अभिवादन केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्याही समाधीस्थळी जावून अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागात 'कऱ्हाड' ठरलं अव्वल

मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणुकीत सर्वांच्या सहकार्यामुळे विजय प्राप्त करता आला आहे. सोसायटी मतदार संघातून सर्व मतदारांशी संपर्क साधून मगच निवडणूक लढविली. त्यामुळेच विजय प्राप्त करता आला, कऱ्हाड तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे. त्यामुळे सोसायटी मतदार संघातून उभा राहायचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्व मतदारांशी संपर्क साधला. त्यानंतर निवडणूक लढविली. त्यामुळे यश प्राप्त झाले. तालुक्यात कऱ्हाड दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामुळे तेथील राजकीय समीकरण जुळवून या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. मुळचे हे ठराव आहेत ते दोन वर्षापुर्वीचे आहेत. त्यामध्ये कऱ्हाड दक्षिणमधून डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते, अतुल भोसले, भिमरावदादा पाटील, पैलवान धनाजी पाटील, जयदिश जगताप, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, राजाभाऊ पाटील-उंडाळकर तर कऱ्हाड उत्तरेतून सभापती मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील यांच्यासह मतदारांसह युवक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन विजयासाठी प्रयत्न केले.

loading image
go to top