आमदार शिंदेंचा पराभव करून रांजणे भाजप आमदाराच्या भेटीला I Bank Election 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyandev Ranjane

ज्ञानदेव रांजणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अत्यंत निकटचे विश्वासू व कट्टर समर्थक मानले जातात.

आमदार शिंदेंचा पराभव करून रांजणे भाजप आमदाराच्या भेटीला

कुडाळ (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) अखेर विजयाचा गुलाल अंगावर पडताच जावळी सोसायटी मतदारसंघाचे विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी सर्वप्रथम थेट सुरुची गाठले. आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) या दिगग्ज नेत्याचा पराभव करून विजय मिळवल्यानंतर सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांची त्यांनी सर्वप्रथम भेट घेतली व आज झालेला विजय हा जावलीतील सर्वसामान्य जनता, माझे दैवत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्षाचे नेते अजित पवार यांना मी हा विजय समर्पित करत असल्याचे रांजणे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

हेही वाचा: शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव

ज्ञानदेव रांजणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अत्यंत निकटचे विश्वासू व कट्टर समर्थक मानले जातात. ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे या सुद्धा जावलीतील कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आहेत. राजकारणात नवखे असणारे रांजणे दाम्पत्य गेल्या 5 वर्षांपासून जावलीतील राजकारणात सक्रिय असून, राजकारणासह समाजकारणात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने अल्पावधीतच रांजणे दाम्पत्याने जावलीतील जनतेला आपलेसे केले आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

कोरोना व अतिवृष्टी काळात त्यांनी आमदार भोसले यांच्या मदतीनं भरीव काम केलं होतं. आमदार भोसले यांच्यावर असलेली निष्ठा हीच त्यांच्या आजच्या विजयासाठी सत्कारणी लागली आहे. आमदार भोसले यांनीसुद्धा जावलीतील विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायमच ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही त्याचा प्रत्यय आला. रांजणे हे सुद्धा राष्ट्रवादीचेच असल्याने व जिल्हा बँकेतील विजयामुळे भविष्यातील जावळीच्या राजकारणात मात्र यानिमित्ताने नक्कीच उलथापालथ पहायला मिळणार आहे.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

loading image
go to top