Political : BJP आमदाराच्या 'या' विधानामुळे NCP आमदाराचा विजयाचा मार्ग मोकळा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendrasinharaje Bhosale

राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याने रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदे राहिले; पण..

BJP आमदाराच्या 'या' विधानामुळे NCP आमदाराचा विजयाचा मार्ग मोकळा?

कऱ्हाड (सातारा) : रांजणे हे माझ्याबरोबर असतात. ते आणि त्यांचे मंडळी राष्ट्रवादीतच (NCP) आहेत. इच्छुक होणे काही गैर नाही. थोड्याफार समज-गैरसमजुतीमुळे विषय पुढे गेला आहे. या एक-दोन दिवसांत तो विषय मार्गी लागेल, असे सूचक वक्तव्य सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी येथे केले. दरम्यान, या वक्तव्यामुळे आमदार शशिकांत शिंदेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) सर्वाधिक रंगतदार लढत जावळी सोसायटी मतदारसंघात होत असून, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या (MLA Shashikant Shinde) विरोधात ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याने श्री. रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदे राहिले; पण मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत रांजणे यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी शशिकांत शिंदेंची अडचण वाढली आहे. दरम्यान, सहकार पॅनेलच्या निवडणूक प्रचारार्थ सहकारमंत्री पाटील यांनी आज आयोजिलेल्या मेळाव्यासाठी आमदार भोसले आज येथे आले होते. त्या वेळी रांजणेंच्या उमेदवारीबद्दल त्यांना पत्रकारांनी बोलते केले.

हेही वाचा: मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात

अजिंक्यतारा कारखान्यावर झालेल्या सहकार पॅनेलच्या मेळाव्यात आपण सातारा तालुक्यातील सर्व मते सहकार पॅनेलला पडतील, असे सांगितले. जावळी तालुक्यातील मतांचे काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘जावळी तालुक्यातही योग्य पद्धतीने निर्णय होईल. इकडे-तिकडे काय होईल, असे वाटत नाही. आमचे प्रयत्न सुरू आहेत. रांजणे हे माझ्याबरोबर असतात; पण ते आणि त्यांचे मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी इच्छुक होणे काही गैर नाही. थोड्याफार समज-गैरसमजुतीमुळे विषय पुढे गेला आहे. मात्र, या एक- दोन दिवसांत तो विषय मार्गी लागेल.’’ रांजणेंच्या आक्रमक भूमिकेत आमदार भोसले हे मध्यस्थी करतील, अशी शक्यता असल्याने शशिकांत शिंदेंचा मार्ग सुकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: सहकारमंत्र्यांच्या बॅनरवर पहिल्यांदाच झळकले 'भोसले'

‘‘सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुका लागलेल्या सर्व जागांना अडचण येणार नाही. जिथे जिथे सहकार पॅनेलचे उमेदवार आहेत, ते मताधिक्यांनी निवडून येतील. जावळी तालुक्यात योग्य पद्धतीने निर्णय होईल. आमचेही प्रयत्न सुरू आहेत.’’

-शिवेंद्रसिंहराजे भोसले

हेही वाचा: महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'

loading image
go to top