मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात; शरद पवारांनी सूचवली होती 'उमेदवारी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

मानेंना उमेदवारी द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना केली होती; पण..

मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात

sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (सातारा) : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोरेगाव तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलमधून सोसायटी मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक (Shivajirao Mahadik) व आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांच्या गटाच्या सुनील खत्री (Sunil Khatri) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. जावळीच्या मैदानात अडकल्याने शशिकांत शिंदे यांना मतदारसंघात पुरेशे लक्ष घालता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधात शिवसेना (Shiv Sena) आमदार गट अशीच लढत कोरेगावच्या मैदानात पाहायला मिळणार आहे.

कोरेगाव तालुक्यात सोसायटी मतदारसंघाचे एकूण ९० मतदार आहेत. त्यातील अनेक सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. आमदार महेश शिंदे यांचे समर्थकही काही सोसायट्यांवर आहेत. दोन्ही आमदार गटातील कार्यकर्ते विजय आपलाच होणार, असा दावा करत आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची राहणार असल्याचे दिसते. राष्ट्रवादीने बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचा पत्ता कट करून शिवाजीराव महाडिक यांना मैदानात उतरविले आहे. सुनील माने यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सूचना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सुरवातीलाच केली होती; पण त्यानंतरच्या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी होऊन पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

Shivajirao Mahadik

Shivajirao Mahadik

परिणामी, माने यांची उमेदवारी कापण्यात आली. त्याबद्दलची नाराजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव सोसायटींच्या मतदारांतही आहे. या नाराजीचा फटकाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. आमदार महेश शिंदे यांनी दिवसेंदिवस आपले स्थान घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा सुनील खत्री यांना होऊ शकतो. आमदार शशिकांत शिंदे हे जावळी सोसायटीच्या निवडणुकीत अडकल्याने त्यांना कोरेगावात फारसे लक्ष देता येणार नाही. त्याचाही काहीसा परिणाम दिसू शकतो. कोरेगाव सोसायटी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष घातले, तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अवघड नाही; पण नाराजांनी या निवडणुकीत बदलाचा सूर आळवला, तर कोरेगावात अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

हेही वाचा: दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

रामभाऊ लेंभेंच्या लढतीकडेही लक्ष

नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघातून सहकारातील अनुभवी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. सहकारातील अभ्यासू नेतृत्व म्हणून रामभाऊ लेंभे यांच्याकडे पाहिले जाते. ते कोरेगाव तालुक्यातील असल्यामुळे या लढतीकडेही कोरेगाववासियांचे लक्ष आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल

loading image
go to top