निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात जमावबंदी आदेश लागू I Bank Election 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

मेढ्यात दोन्ही गटांमध्ये वादावादी झाल्याचे निदर्शनास आले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

कुडाळ (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) आज (मंगळवार) मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता जावळी तालुक्यामध्ये कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र पोळ (Tehsildar Rajendra Pol) यांनी दिली.

याबाबत प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मंडळाची मतदानाची प्रक्रिया २१ रोजी पार पडली असून, त्या दिवशी मेढा येथे दोन्ही गटांमध्ये वादावादी झाल्याचे निदर्शनास आले होते. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २३ रोजी दोन गटांमध्ये पुन्हा मतदारांच्या निकालावरून वादावादी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक मेढा यांनी जावळी तालुक्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत विनंती केली आहे.

हेही वाचा: सहकार, गृहराज्यमंत्र्यांसह आमदार शिंदेंचा आज फैसला

त्यानुसार तहसीलदारांनी कलम १४४ प्रमाणे आदेश काढले आहेत. यामध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने जावळी तालुक्यामध्ये कोठेही मिरवणूक काढणे, प्रक्षोभक भाषण करणे, विजयी रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. जमावबंदी रात्रीपासूनच लागू होत असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा 'विजयाचा' फ्लेक्स झळकताच पोलिसांनी काढला

loading image
go to top