
साताऱ्यात मतमोजणीला प्रारंभ झाला असून थोड्याच वेळात निकालाचा फैसला होणार आहे.
कऱ्हाड (सातारा) : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कऱ्हाड सोसायटी (Karad Society) गटात रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांना (Udaysingh Patil-Undalkar) मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय. सातारा येथे मतमोजणीला प्रारंभ झाला असून थोड्याच वेळात निकालाचा फैसला होणार आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी घेतली. त्यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उमेदवारी घेतली होती. त्यामुळं ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनलीय. निवडणुकीसाठी रविवारी शंभर टक्के मतदान झाले आहे.
सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकरांना मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान, मतमोजणी आज मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सातारा येथील सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या हॉलमध्ये प्रारंभ झाला आहे. सध्या मतदान पत्रिकेचे गट्टे करण्याचे काम सुरू असून थोड्या वेळात निकाल हाती येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.