शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शिंदे, रांजणे यांच्यात चुरशीची लढत; काही तासांत निकाल होणार स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे जिल्ह्याच्या राजकीय चक्रव्यूहात एकाकी पडलेले पहायला मिळाले.

शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शिंदे, रांजणे यांच्यात चुरशीची लढत

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ : सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत (Satara Bank Election) जावळी तालुका (Jawali Taluka) सोसायटी मतदारसंघातील एक जागेसाठी 100 टक्के मतदान झाले होते. सर्वच्या सर्व 49 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवार (ता. 23) सातारा येथे सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होत आहे.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील निकाल हाती आले आहेत. राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलनं मुसंडी मारली असली तरी सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जावळी सोसायटी मतदारसंघातील निकालाबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्यात सरळ लढत झाली असून आमदार शिंदे हे जिल्ह्यातील हेविवेट नेते असल्याने त्यांचे राजकीय कसब या निवडणुकीत पणाला लागले असल्याने या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील नेत्यांसह शरद पवार, अजित पवार यांना देखील लागली आहे.

हेही वाचा: 'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..'

निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जावळी सोसायटी मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे, कारण एकेकाळी संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे हालवणारे शिंदे आज त्यांच्याच संचालकपदासाठी कडवी लढत देत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे जिल्ह्याच्या राजकीय चक्रव्यूहात मात्र एकाकी पडलेले पहावयास मिळाले. जिल्ह्यातील अनेक नेते बिनविरोध निवडून गेले असताना शशिकांत शिंदे यांना मात्र केवळ गाफील राहिल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले. गेल्या 10 वर्षापासून ते जावळी मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून जात होते. यावेळी मात्र त्यांना जावलीतील सर्वसामान्य समजले जाणारे उमेदवार व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी कडवे आव्हान उभे केले. 49 मतदारांपैकी 28 मतदार हे रांजणे यांच्या विचाराने प्रभावित झाल्याने आमदार शिंदे यांच्या अडचणीत वाढ झालेली पहावयास मिळाली. दीड महिन्यापासून जावलीतील बहुतांशी मतदार हे सहलीवर गेल्याने शिंदे यांची खऱ्या अर्थाने गोची झाली. मतदारांशी शेवटच्या दिवसापर्यंत भेटच होऊ न शकल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागणार, अशी चर्चा निवडणुकी आधीपासूनच जिल्ह्यात सुरू झाली.

Shashikant Shinde

Shashikant Shinde

हेही वाचा: सहकार, गृहराज्यमंत्र्यांसह आमदार शिंदेंचा आज फैसला

सुरुवातीपासून आमदार शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याच्या चर्चेने व रांजणे यांच्या बाजूने एकतर्फी निवडणूक होणार असल्याचा आटकळी बांधल्या गेल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. शेवटपर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतदानादिवशी मात्र अटीतटीची ठरली. आमदार शिंदे यांनीही आपले राजकीय डावपेच दाखवून देत निकाल फिरवण्या इतपत मजल मारली. मतदानादिवशी आमदार शिंदे यांनी बाजी पलटवण्याचा पूर्ण प्रयत्न करत टायगर अभि जिंदा है'चाच प्रत्यय जिल्हावासियांना दाखवून दिला. एकूण 49 मतदार असल्याने विजयासाठी 25 हा मॅजिक आकडा गाठणे गरजेचे असून, आमदार शिंदे व ज्ञानदेव रांजणे दोन्हीही उमेदवारांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मतदारांनी त्यांचा कौल नक्की कोणाला दिला आहे, हे काही तासांत च कळणार असून जावलीत कोण्याच्या अंगावर गुलाल तर कोणाचे होणार चांगभलं हे लवकरच कळणार आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

loading image
go to top