esakal | बेळगाव: सहा मराठी शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव: सहा मराठी शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार

बेळगाव: सहा मराठी शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव: शिक्षक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ६ मराठी शिक्षकांसह ३९ शिक्षकाना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा: पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, 1 जण जागीच ठार

दरवर्षी शिक्षक दिनाच्या अगोदर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विजेत्या शिक्षकांची नावे जाहीर केली जातात. यावेळी शिक्षक कल्याण निधीतून पूर्व प्राथमिक शाळांमधील ७ शिक्षक, उच्च प्राथमिक शाळा मधील ७ तर माध्यमिक शाळांमधील सहा शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर जिल्हा पंचायत व शिक्षण खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक विभागातील १४ शिक्षक तर माध्यमिक विभागातील पाच शिक्षकांचा समावेश आहे. रविवारी (ता.५) सकाळी १०-३० वा. महांतेश नगर येथील महांत भवन येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील आनंदगड विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल येथील सरकारी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सदानंद पाटील, ढोकेगाळी येथील पूर्व प्राथमिक शाळेतील नारायण करंबळकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तसेच बेळगाव तालुक्यातील राजहंसगड येथील मराठी शाळेतील शिक्षक विवेक गुंडू सुतार, अगसगे हायस्कुलमधील रवींद्र मधाळे, कावळेवाडी शाळेतील भरमान्ना देवरमनी तर शहरातील सरकारी मराठी शाळा क्रमांक २२ येथील सहशिक्षिका भारती पाटील, गोवा येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक २५ येथील एस पी मोडक यांनाही पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा: वादातून हातावर चाकू मारल्‍याप्रकरणी सैदापुरात महिलेवर गुन्‍हा

जिल्हास्तरीय पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांमध्ये कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांमध्ये शोभा वी, विणा कुलकर्णी, कमला स्वरमंडळ, रमेश चीकुंबी, बि जी दबाडी, मंजुनाथ मडीवाळकर, एम के सुग्गी, यस यस नागेटी, उमा कडकोळ, सदानंद वड्डर, श्रीकांत बडबडगी, प्रकाश हूलमनी, ए.एच शिरगुप्पी, तीप्पा नायक, रवी बुलबुले, एस वि भुसण्णावर, आय सी परुननवर, हनमंत गौडा पाटील, ए.जे.कुलकर्णी, सि.टी. पूजार, इस्माईल बागवान, एस आर कुरबेट, आय जी हिरेमठ आदी शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

loading image
go to top