esakal | उंब्रजात ऐतिहासिक परंपरा असलेली भीम-कुंती यात्रा उत्साहात
sakal

बोलून बातमी शोधा

उंब्रजात ऐतिहासिक परंपरा असलेली भीम-कुंती यात्रा उत्साहात

या वर्षी कुंतीमातेला रथात घेऊन विराजमान होण्याची लिलावाची बोली दीपक शेखर जाधव यांनी करत कुंतीमाते शेजारी बसण्याचा बहुमान मिळवला.

उंब्रजात ऐतिहासिक परंपरा असलेली भीम-कुंती यात्रा उत्साहात

sakal_logo
By
संतोष चव्हाण

उंब्रज (सातारा): येथील भीम-कुंती यात्रा कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत झाली. ऐतिहासिक परंपरा असलेला व आध्यात्मिक वारसा जोपासणाऱ्या भीम- कुंती भेटीचा सोहळा 'भीमसेन महाराज की जय', 'कुंतीमाता की जय' गजर करीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्षी कुंतीमातेला रथात घेऊन विराजमान होण्याची लिलावाची बोली दीपक शेखर जाधव यांनी करत कुंतीमाते शेजारी बसण्याचा बहुमान मिळवला.

हेही वाचा: तांबवे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांत धास्ती

शेकडो वर्षांची परंपरा असलेली भीम- कुंती यात्रा कोरोना संकटामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार झाली. या वेळी पुत्र भीम व माता कुंती सोहळ्यासाठी भीमसेन मंडळ यांनी सकाळी ११ वाजता भीम मंडपात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सर्वानुमते कुंतीमाते शेजारी बसण्याच्या लिलाव बोलीला सुरवात झाली. या वेळी दीपक जाधव यांनी २१ हजार रुपयांची सर्वाधिक बोली बोलून कुंतीमातेसोबत रथात घेऊन बसण्याचा मान मिळवला.

हेही वाचा: उंब्रज ग्रामपंचायतीचा 'महावितरण'ला जोर का झटका; वीज तोडल्याने संताप

भीम सेन मंडळ व ग्रामस्थांनी महामुनी यांच्या घरापासून मिरवणुकीस प्रारंभ केला. मिरवणूक भैरवनाथ मंदिरमार्गे ग्रामपंचायत इमारतीच्या रस्त्याने बाजारात आली. या वेळी 'भीमसेन महाराज की जय', 'कुंतीमाता की जय' चा गजर होत होता. यानंतर मिरवणूक बाजारपेठेतून पाटण तिकाटणे येथून कॉलेज रोडला असणाऱ्या हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालून भीम मंडपात आली. या वेळी 'पुत्र भीम' व 'कुंतीमाता' यांच्या भेटीचा सोहळा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा झाला.

loading image
go to top