esakal | साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! किरकसालच्या चिन्मय सावंतांचा पक्षी निरीक्षक पुरस्काराने सन्मान

बोलून बातमी शोधा

Chinmay Sawant

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! किरकसालच्या चिन्मय सावंतांचा पक्षी निरीक्षक पुरस्काराने सन्मान

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : नवीन पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक घडावेत, यासाठी होप या संस्थेकडून देण्यात येणारा यंदाचा उदयोन्मुख पक्षी निरीक्षक पुरस्कार किरकसाल (ता. माण) येथील चिन्मय सावंत यांना जाहीर झाला आहे.

ठाणे येथील हियर ऑन प्रोजेक्‍ट एनव्हार्नमेंट या संस्थेने महाराष्ट्र पक्षी मित्रांकडून याबाबत प्रस्ताव मागविले होते. 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यास दिला जाणाऱ्या यंदाच्या उदयोन्मुख पक्षी निरीक्षक या पुरस्कारासाठी सावंत यांची निवड करण्यात आली आहे. चिन्मय हा मत्स्य विज्ञान पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, महाराष्ट्र पक्षी मित्रचा सभासद आहे.

साताऱ्यातील पश्‍चिम घाटात नव्या प्रजातींचा शोध; ठोसेघरात शोधले दोन नवे 'चतुर'

लहानपणापासून पक्षी, फुलपाखरे, साप, समुद्र प्राणी यांची आवड व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेला चिन्मय हा सध्या किरकसाल गावाची लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्याचे काम करीत आहे. यामधून जैवविविधता संवर्धन व जनजागृतीसाठी देखील तो प्रयत्नशील आहे. पक्षी अभ्यास हा त्याचा आवडता विषय असून, तो वेबिनार व पक्षी निरीक्षण सहलींच्या माध्यमातून पक्षी निरीक्षणाचे धडे देतो. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख अडीच हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप असून, त्याचे वितरण सोलापूरमध्ये 34 व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

Edited By : Balkrishna Madhale