'जातीयवादी पक्षांकडून देशात दुफळी माजविण्याचा प्रयत्न'

Prithviraj Chavan
Prithviraj Chavanesakal
Summary

'इंग्रजांनी देश लुटून नेल्यानंतर तो समृद्ध करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी धोरणात्मक निर्णय घेतले.'

कऱ्हाड (सातारा) : काँग्रेसने (Congress) घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला जातीयवादी पक्षांकडून फाटा देत देशात जातीय दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला रोखण्यासाठी व देशाला एकसंघ ठेवण्यासाठी काँग्रेसनं नोंदणी अभियान हाती घेतलं आहे. काँग्रेसचाच एकसंघ विचार भारत देशाला प्रगतीकडे नेणारा आहे, असं मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्ते केले.

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसतर्फे (Karad South Congress) शहर व परिसरात डिजिटल नोंदणी अभियानास आजपासून प्रारंभ केला. त्यावेळी आमदार चव्हाण बोलत होते. आमदारांच्या हस्ते नोंदणीस सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील (Udaysingh Patil), कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण उपस्थित होते.

Prithviraj Chavan
'हत्तीची गरज काय? तुम्ही अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन'
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

आमदार चव्हाण पुढे म्हणाले, इंग्रजांनी देश लुटून नेल्यानंतर तो समृद्ध करण्यासाठी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यानंतरच्या काँग्रेसच्या सर्व नेतृत्वांनी देशास समृद्ध करीत देशातील जनतेला एकसंघ ठेवले. परंतु, आता जातीयवादी पक्षांचा देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविणार असून त्याची व्याप्ती बूथ स्तरापर्यंत आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कऱ्हाड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.

Prithviraj Chavan
सगळीकडं मीच त्यांना दिसतो, माझ्‍याच नावानं ते गरळ ओकतात : उदयनराजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com