

Satara Gears Up for Legislative Council Battle; BJP Eyes Strong Candidates
sakal
सातारा : विधान परिषदेच्या ‘सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्था’ मतदारसंघाचा बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. येत्या १८ जूनला मतदान आणि २२ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या मतदारसंघात साताऱ्यात भाजपची बाजू भक्कम असून, विक्रम पावसकर आणि धैर्यशील कदम या दोघांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत.